धनगरवाड्यावर आले पाणी
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T00:02:30+5:302015-07-25T01:13:31+5:30
तात्पुरता दिलासा : ट्रान्सफॉर्मर बसवल्याने २४ व्या दिवशी योजना सुरू

धनगरवाड्यावर आले पाणी
आंबा : ट्रान्सफॉर्मर जळाल्याने बंद पडलेल्या तीन वस्त्यांची पाणी योजना गुरुवारी २४व्या दिवशी सुरू झाली. ‘लोकमत’ने धनगर समाजाच्या तक्रारीबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महावितरण प्रशासन तत्काळ हलले. येथे पावसाळ्यापुरता जुना ट्रान्सफॉर्मर बसविला आहे. महावितरण तीन आठवड्यांत नवीन ट्रान्सफॉर्मर देऊ शकत नाही, याची ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली.
अतिवृष्टीच्या भागातील दुर्गम तीन वस्त्यांचा भार या ट्रान्सफॉर्मरवर आहे. त्यामुळे महावितरणने येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची गरज उपसरपंच डी. जी. लांबोर व माजी उपसभापती बाळकृष्ण गद्रे यांनी व्यक्त केली. मानोलीऐवजी आंब्यातील ट्रान्सफॉर्मरवरून या वाड्यांवर वीज कनेक्शन देण्याचा पर्याय त्यांनी सुचविला आहे.