जलस्रोतात दूषित पाणी...
By Admin | Updated: June 21, 2015 00:28 IST2015-06-21T00:28:35+5:302015-06-21T00:28:35+5:30
वडाळी परिसरात पाणी पुरवठा करणारी ही विहीर.

जलस्रोतात दूषित पाणी...
वडाळी परिसरात पाणी पुरवठा करणारी ही विहीर. या विहिरीच्या पाण्याचा नागरिक पिण्यासाठी देखील वापर करतात. वडाळी परिसरात सार्वजनिक नळ नसल्याने या विहिरीवर महिलांची अशी गर्दी असते. परंतु विहिरीतून पाणी काढून विहिरीच्याच कठड्यावरच महिला धुणी धुतात. त्यामुळे घाण पाणी पुन्हा विहिरीत जाते. परिणामी विहिरीतील पाणी दूषित होत आहे. नागरिकांच्या दुर्लक्षामुळे व बेजबाबदार वागण्याने आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जलस्रोत असे दूषित होत आहेत.