लाकूडवाडीनजीक अपघातात वाटंगीचे पोस्टमन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST2021-06-30T04:16:51+5:302021-06-30T04:16:51+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावर महागावनजीकच्या लाकूडवाडी घाटातील वळणावर दुचाकींची समोरासमोर जोरात धडक झाली. त्यात जुजेवाझ फास्कू डिसोझा (वय ...

Watangi's postman killed in an accident near Lakudwadi | लाकूडवाडीनजीक अपघातात वाटंगीचे पोस्टमन ठार

लाकूडवाडीनजीक अपघातात वाटंगीचे पोस्टमन ठार

गडहिंग्लज : गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावर महागावनजीकच्या लाकूडवाडी घाटातील वळणावर दुचाकींची समोरासमोर जोरात धडक झाली. त्यात जुजेवाझ फास्कू डिसोझा (वय ५८, रा. वाटंगी, ता. आजरा) हे ठार झाले. त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेले शशिकांत कुंभार तर दुसरे दुचाकीस्वार नसरूद्दीन गुलाब शेख हे दोघे जखमी झाले आहेत. सोमवारी (२८) सायंकाळी ७ च्या सुमारस हा अपघात घडला.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, वाटंगीचे डिसोझा व नेसरीचे कुंभार हे गडहिंग्लज येथील मुख्य पोस्ट आॅफिसमध्ये पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत.

सोमवारी (२८) सायंकाळी डिसोझा यांच्या (एमएच ०९, बीडी ६७२९) वरून दोघेही गडहिंग्लजहून गावी जात होते. कुंभार हे मागे बसले होते.

दरम्यान, महागाव ओलांडल्यानंतर लाकूडवाडी घाटाच्या वळणावर नेसरीकडून भरधाव वेगाने येणा-या नसरूद्दीन गुलाब शेख यांच्या दुचाकीने (एमएच ०९ एई ७८७२) ने डिसोझा यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली.

अपघातात डिसोझा व शेख दोघेही गंभीर तर कुंभार हे किरकोळ जखमी झाले. जखमींना येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले. उपचारादरम्यान डिसोझा यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. डॉ. रोझारिओ डिसोझा यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

चौकट :

चार महिन्यांपूर्वीच बढती

डिसोझा हे त्यांच्या वाटंगी गावातील पोस्ट कार्यालयात खातेबाह्य कर्मचारी म्हणून सुमारे २५ वर्षे कार्यरत होते. १ फेब्रुवारी २०२१ पासून त्यांना बढतीने गडहिंग्लजच्या मुख्य टपाल कार्यालयात कायमची नोकरी मिळाली होती. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

चौकट :

पोस्ट कर्मचा-यांची श्रद्धांजली

अत्यंत मनमिळावू व कामसू पोस्टमन डिसोझा यांच्या दुर्देैवी मृत्यूने अधिकारी कर्मचा-यांनाही धक्का बसला. सकाळी गडहिंग्लजच्या मुख्य कार्यालयात पोस्ट खात्यातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रभारी पोस्ट मास्तर किरण नलवडे, दीपक दिवाणी, श्रीनिवास औरसंगे, प्रशांत पत्की व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट :

कुंभार हे दवाखान्यासाठी गडहिंग्लजला आले होते. जाताना ते डिसोझा यांच्या गाडीवरून नेसरीला जात होते. पोस्टाचे नेसरी भागातील प्रभू पाटील व कापसे या कर्मचा-यांची गाडी त्यांच्या पुढे होते. कुंभार यांच्याकडून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ते मागे परत आले. त्यांनीच १०८ रुग्णवाहिकेला बोलावून आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी गडहिंग्लजला आणले.

फोटो : जुजेवाझ डिसोझा : २९०६२०२१-गड-१२

Web Title: Watangi's postman killed in an accident near Lakudwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.