वारूळ ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:46+5:302021-01-08T05:19:46+5:30

मलकापूर प्रतिनिधी : वारूळ (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ६४ वर्षांत पहिल्यादाच बिनविरोध झाली. निमित्ताने गावातील पारंपरिक राजकीय संघर्ष ...

Warul Gram Panchayat unopposed | वारूळ ग्रामपंचायत बिनविरोध

वारूळ ग्रामपंचायत बिनविरोध

मलकापूर प्रतिनिधी : वारूळ (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ६४ वर्षांत पहिल्यादाच बिनविरोध झाली. निमित्ताने गावातील पारंपरिक राजकीय संघर्ष सध्या तरी थांबला आहे. नव्या चेहऱ्यांना सदस्य होण्याची संधी दिली आहे. सध्या गावचे नेतृत्व माजी सरपंच शंकर पाटील, गोविंद सुतार, यशवंत पाटील, सिराज शेख, किरण परीट करत आहेत. गावात जनसुराज्य, शिवसेना, स्वभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे कार्यकर्त कार्यरत आहेत. गावचा गावगाडा चालविण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांनी गावात बैठक बोलावून चालूवर्षीची निवडणूक बिनविरोध करण्याचे एकमुखाने ठरले. सात सदस्यांचे नामनिर्देशने भरून निवडणूक बिनविरोध केली. सुकाणू समितीचे सिराज शेख, गोविंद सुतार, प्रमुख नामदेव शिराळकर, प्रकाश शिराळकर, दिलीप कांबळे, बाळकृष्ण पाटील, देवजी पाटील, भाऊ पाटील, सीताराम बोटागळे, वसंत पाटील, शंकर पाटील, लक्ष्मण पाटील, शामराव पाटील, आर. एस. कांबळे, संजय कांबळे, अशोक तावरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निवडीनंतर ग्रामस्थांनी समाधान व्यवत्त करून फटाक्याची आतषबाजी केली.

फोटो वारूळ (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ६४ वर्षांत पहिल्यादाच बिनविरोध झाली.

Web Title: Warul Gram Panchayat unopposed