महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वॉरंट
By Admin | Updated: March 9, 2015 23:48 IST2015-03-09T22:26:45+5:302015-03-09T23:48:34+5:30
हरित न्यायालयाचे आदेश : याचिकेला गैरहजर राहिल्याचे प्रकरण

महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वॉरंट
सांगली : जिल्हा सुधार समितीने घनकचरा व भटक्या कुत्र्यांबाबत दाखल याचिकेवरील सुनावणीस गैरहजर राहून म्हणणे सादर न केल्याने, मनपच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध हरित न्यायालयाच्या पुणे खंडपीठाने वॉरंट बजावले आहे. समितीचे अॅड. अमित शिंदे व प्रा. आर. बी. शिंदे यांनी सोमवारी ही माहिती दिली. समितीचे प्रा. शिंदे, अॅड. असीम सरोदे व अॅड. अमित शिंदे यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका हद्दीमध्ये वेळेवर कचरा उठाव होत नाही, कचरा डेपोत बेकायदेशीरपणे कचरा जाळला जातो. महापालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही शास्त्रीय व्यवस्था केलेली नाही. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे, अशा मुद्यांवर ही याचिका दाखल केली आहे. मागील तारखेस हरित न्यायालयाने आराखडा सादराचे आदेश मनपा प्रशासनास दिले असताना त्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे हरित न्यायालयाने कानउघाडणी करून अटक वॉरंटचे आदेश दिले.