शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरुड ते भेडसगाव दरम्यानचा वारणा नदीकाठ बनला बिबट्याचे आश्रयस्थान, गेल्या दिड महिन्यापासून या परिसरात वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 13:54 IST

Leopard In Kolhapur : गेल्या दिड महिन्यापासुन सरुड , शिंपे , वारणा कापशी , शिवारे ते भेडसगाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून येत असुन या गांवाच्या पश्चिमेकडील असलेली डोंगररांग व वारणा नदीकाठ परिसर बिबट्याच्या वास्तव्याचे स्थान बनल्याचे दिसून येत आहे .

- अनिल पाटील सरुड -गेल्या दिड महिन्यापासुन सरुड , शिंपे , वारणा कापशी , शिवारे ते भेडसगाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून येत असुन या गांवाच्या पश्चिमेकडील असलेली डोंगररांग व वारणा नदीकाठ परिसर बिबट्याच्या वास्तव्याचे स्थान बनल्याचे दिसून येत आहे . गेल्या दिड महिन्यापासुन  बिबट्याचा या डोंगररांगेत व वारणा नदीच्याकाठी अधिवास असल्यामुळे या गावच्या परिसरातील शेतकरी वर्ग या बिबट्याच्या दहशतीच्या छायेखाली आहे . गेल्या महिनाभरात या बिबट्याने पाळीव प्राण्यांचा पाडलेला फडशा पाहता  वन विभागाने त्वरीत या बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

गेल्या दिड महिन्यापूर्वी प्रथमता सरुड येथील पाळीव कुत्र्यावर या बिबट्याने हल्ला करत त्याचा फडशा पाडल्यानंतर या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले . त्यांनतर बिबट्याने डोंगर रांगेतुन आपला मोर्चा भेडसगाव , वारणा कापशी , शिवारे या गावाच्या हद्दीत वळवत तेथील शेळ्यांना आपले लक्ष्य करत वारणा नदीच्या या पट्यात आपली दहशत निर्माण केली आहे .  भक्ष्य मिळू लागल्याने भेडसगाव ते सरुड , शिंपे दरम्यान असणारी डोंगर रांग व पुर्वेकडील वारणा नदीकाठ या दरम्यानच्या परिसरातच हा बिबट्या गेल्या दिड महिन्यापासुन ठाण मांडून आहे . कधी डोंगरावर तर कधी वारणानदी काठच्या शेत शिवारात या बिबट्याचा वावर आढळून येत आहे . त्यामुळे या परिसरातील  शेतकऱ्यांनी या बिबट्याचा चांगलाच धसका घेतला आहे.                   वारणा नदीकाठ परिसरात पाळीव प्राण्यांच्यावरील बिबट्याचे वाढते हल्ले पाहता या परिसरातील  पाळीव प्राणी तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामुळे  वन विभागाने या परिसरात सापळा लावुन या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा .  - अमरसिंह पाटील, सरपंच, भेडसगाव   

वनविभागाच्या नागपूर येथील कार्यालयाकडुन परवानगी मिळाल्याशिवाय बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सापळा लावता येत नाही . त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून एकट्याने शेतात जाऊ नये . शेतात जाताना मोबाईलवर गाणी लावावी जेणेकरुन आवाजामुळे बिबट्या दूर जाईल . सुरक्षिततेसाठी पाळीव प्राण्यांचा गोठा बंदिस्त ठेवावा . 

- अमित भोसले,  वनपरिक्षेत्र अधिकारी, मलकापूर 

वारणा कापशी येथे बिबट्याचा पुन्हा शेळ्यांवर हल्ला  शनिवारी रात्री वारणा कापशी येथील वाडीचे टेक परिसरात सर्जेराव खवरे यांच्या गोठ्यातील दोन शेळ्या व एक बोकड यांच्यावर बिबट्याने हल्ला करत त्यांना ठार केले आहे . गेल्या दहा दिवसातील वारणा कापशी येथील बिबट्याच्या हल्याची ही दूसरी घटना आहे .

टॅग्स :leopardबिबट्याkolhapurकोल्हापूर