वारणा दूध संघाची उद्या ५२ वी वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:22 IST2021-01-18T04:22:55+5:302021-01-18T04:22:55+5:30

वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. १९) दुपारी ...

Warna Dudh Sangh's 52nd annual meeting tomorrow | वारणा दूध संघाची उद्या ५२ वी वार्षिक सभा

वारणा दूध संघाची उद्या ५२ वी वार्षिक सभा

वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. १९) दुपारी २ वाजता वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली.

येथील वारणा दूध उत्पादक संघाने दोन वर्षांपूर्वीच सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. यानिमित्ताने शेतकरी सभासद व कामगारांसाठी अनेक योजना, सुविधा राबविल्या आहेत. संघाने ५२ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. संघाच्या तात्यासाहेब कोरेनगर येथील कार्यस्थळावर मंगळवारी दुपारी दोन वाजता ही वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेसमोरील १३ विषयांसह ऐनवेळच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या सभेला सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष आमदार कोरे व कार्यकारी संचालक येडूरकर यांनी केले आहे.

Web Title: Warna Dudh Sangh's 52nd annual meeting tomorrow