वारणा दूध संघाच्या कर्मचारी वैद्यकीय शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:44+5:302020-12-30T04:31:44+5:30

वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १२ ते ...

Warna Dudh Sangh staff responds to medical camp | वारणा दूध संघाच्या कर्मचारी वैद्यकीय शिबिरास प्रतिसाद

वारणा दूध संघाच्या कर्मचारी वैद्यकीय शिबिरास प्रतिसाद

वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १२ ते १९ डिसेंबर या कालावधित कर्मचारी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर मोफत घेण्यात आले. प्रारंभी तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व शिबिराचे उद्घाटन संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्याहस्ते झाले.

यावेळी दूध संघाशी संलग्न असलेल्या सावित्री औद्योगिक महिला संस्था, अमृत कामगार सोसायटी, दूध-साखर वाहतूक या संस्थांतील कर्मचाऱ्यांची अत्याधुनिक उपकरणाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांना आरोग्याबद्दल सुयोग्य असे मार्गदर्शनही करण्यात आले. सिद्धिविनायक नर्सिंग होमचे डॉ. संजय देसाई, डॉ. संदीप पाटील व इतर टीमने दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली.

यावेळी संघाचे पर्सोनल मॅनेजर बी. बी. चौगुले, अकौंट्‌स मॅनेजर सुधीर कामेरीकर, अधिकारी आर. बी. महाजन, श्रीधर बुधाळे, अनिल लंबे, रामचंद्र जाधव, सिद्धिविनायक नर्सिंग होमचे व्यवस्थापक डॉ. शाब्बास इनामदार, डॉ. अमित राजपूत, डॉ. हंकारे, डॉ. पठाण, डॉ. देवकर व डॉ. राकेश पाटील आदी उपस्थित होते.

.............................................

फोटो..

तात्यासाहेब कोरेनगर येथे वारणा दूध संघ व सिध्दिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर यांच्या सहकार्यातून कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्‌घाटन संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. संजय देसाई, डॉ. संदीप पाटील, बी. बी. चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते.

फोटो -

Web Title: Warna Dudh Sangh staff responds to medical camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.