वारणा सह. साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:37 AM2020-10-12T10:37:11+5:302020-10-12T10:38:47+5:30

warnanager, vinaykore, kolhapurnews वारणानगर येथील श्री.वारणा महिला उद्योग समूह, वारणा बझार व श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सह साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे वय ७७ यांचे आज सोमवारी दि. १२ रोजी पहाटे सोलापूर येथे निधन झाले.

With Warna. Death of Shobhatai Kore, President of Sugar Factory | वारणा सह. साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांचे निधन

वारणा सह. साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देवारणा सह. साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे यांचे निधनवारणा समूहासह परिसरावर शोककळा

वारणानगर - येथील श्री.वारणा महिला उद्योग समूह, वारणा बझार व श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सह साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे वय ७७ यांचे आज सोमवारी दि. १२ रोजी पहाटे सोलापूर येथे निधन झाले.

श्रीमती शोभाताई कोरे या गेली काही दिवस अजारी होत्या सोलापूर येथे असणाऱ्या कन्या व जावई यांच्या हॉस्पीटलमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

वारणा समूहाचे संस्थापक वारणा खो-याचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे, वारणा साखर कारखान्याच्या अध्यक्षा स्व. श्रीमती सावित्रीआक्का विश्वनाथ तथा तात्यासाहेब कोरे यांच्या कार्याचा, संस्कारांचा वसा व वारसा समर्थपणे श्रीमती शोभाताई कोरे यानी चालवत सहकार, शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रात आदर्श कार्य केले.

महीला उद्योग व शिक्षण क्षेत्रात सर्वाना मार्गदर्शक ठरलेल्या शोभाताई कोरे या वारणा समूहात आईसाहेब या नावाने सर्वत्र परिचीत होत्या. वारणा बैंकेचे चेअरमन निपून कोरे,आमदार विनय कोरे यांच्या त्या मातोश्री होत. श्रीमती शोभाताई कोरे यांच्या निधनाने वारणा समूहासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

Web Title: With Warna. Death of Shobhatai Kore, President of Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.