वारणा, कडवी नद्यांचे पाणी पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:13+5:302021-06-18T04:17:13+5:30
सरूड : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा व कडवी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन ...

वारणा, कडवी नद्यांचे पाणी पात्राबाहेर
सरूड : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा व कडवी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन दोन्ही नद्यांचे पाणी यावर्षी प्रथमच पात्राबाहेर पडले आहे.
शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागाप्रमाणे पूर्व भागातही पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे पूर्व भागातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच शेतामध्येही पाणी साचून राहिले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी वारणा व कडवी नद्यांची खालावलेल्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने गुरुवारी या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. धूळवाफेतील भातपेरणी केलेल्या पिकांसह माळरानावरील पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे.
फोटो ओळी .
सरूड : गेली दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
(छाया : अनिल पाटील, सरूड)