वारणा बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा मिळवणार(वाणिज्य वृत्त)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:29+5:302021-03-27T04:25:29+5:30

कोल्हापूर : वारणा सहकारी बँकेने मल्टिस्टेट दर्जासाठी आवश्यक असणारे सर्व निकषांची पूर्तता केली असून, लवकरच बँकेला दर्जा मिळेल, असा ...

Warna Bank to get multistate status (Commerce News) | वारणा बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा मिळवणार(वाणिज्य वृत्त)

वारणा बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा मिळवणार(वाणिज्य वृत्त)

कोल्हापूर : वारणा सहकारी बँकेने मल्टिस्टेट दर्जासाठी आवश्यक असणारे सर्व निकषांची पूर्तता केली असून, लवकरच बँकेला दर्जा मिळेल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी व्यक्त केला.

वारणा बँकेची ५५व्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन झाली, त्यामध्ये ते बोलत होते. काेरे म्हणाले, बँकेने २०१९-२० या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती केली असून, वसूल भागभांडवल ३५.३५ कोटी आहे. ठेवी ९३४.८१ कोटी व एकूण कर्जे ६११.२६ कोटी आहेत. बँकेचा मिश्र व्यवसाय १ हजार ५४६.०७ कोटी व सीडी रेशो ६५.३९ टक्के असून बँकेला ऑडीट अ मिळाले आहे. बँकेची ३७ एटीएम मशीन्स कार्यरत असून पीओएस, ई कॉमर्स, मोबाईल, बँकींग व आयएमपीएस सुविधा व आरटीजीएससारख्या सुविधेमुळे दैनंदिन व्यवहार वाढले आहेत. यासह बँकेच्या वाशी, एपीएमसी, नेरूळ, पनवेल, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व अहमदनगर जिल्ह्यात ४० शाखा आहेत.

जनरल मॅनेजर प्रकाश डोईजड यांनी अहवाल वाचन केले. राजेश सार्दळ यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, ज्येेष्ठ संचालक प्रमोद कोरे, बसवेश्वर डोईजड आदी उपस्थित होते.

---

फोटो नं २६०३२०२१-कोल-वारणा बँक

ओळ : वारणा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष निपुण कोरे यांनी बँकेच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. यावेळी राजेश सार्दळ, उत्तमराव पाटील, एच. आर. जाधव उपस्थित होते.

-

Web Title: Warna Bank to get multistate status (Commerce News)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.