शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘तिलारी’च्या पाण्यावर ‘वारणा नवशक्ती’ करणार जलविद्युत निर्मिती, १००८ कोटी रुपयांची गुंतवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:13 IST

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार

मुंबई/कोल्हापूर : आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्थेने जलविद्युत निर्मिती क्षेत्रात पुढचे पाऊल टाकले आहे. चंदगड तालुक्यातील तिलारी धरणातील पाण्यावर या संस्थेच्यावतीने २४० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार कोरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत मंगळवारी सामंजस्य करार झाला. अशा पद्धतीचा उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंपस्टोरेज) हा अपारंपरिक ऊर्जा स्रोतात भर घालणारा उपयुक्त प्रकल्प असून सहकारातून अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच राज्यात होत असल्याचे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.जलसंपदा विभाग आणि या संस्थेमध्ये विधानभवनात हा करार झाला. यावेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, वारणाचे एन. एच. पाटील, ज्योतिरादित्य विनय कोरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. पंप स्टोअरेज क्षेत्रात राज्य शासनाचा हा १६ वा सामंजस्य करार आहे.फडणवीस म्हणाले, पंप स्टोअरेजची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्य शासनाने यासंदर्भात ६५ हजार मेगावॉट क्षमतेचे सामंजस्य करार केले आहेत. पश्चिमी घाटामुळे पंप स्टोअरेज निर्मितीसाठी अतिशय चांगली संधी प्राप्त झाली असून, वारणा समूहाने ज्याप्रमाणे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केले तसेच या जलविद्युत प्रकल्पासाठी देखील ते भरीव योगदान देतील.

पंप स्टोअरेज जलविद्युत प्रकल्प म्हणजे काय..?चंदगड तालुक्यातील तिलारी प्रकल्पातून पाणी खालच्या बाजूला असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील केंद्रे धरणामध्ये सोडले जाईल. हे पाणी सोडताना त्यावर विद्युतनिर्मिती करण्यात येईल आणि पुन्हा हे पाणी तिलारी धरणात उचलून नेण्यात येईल. या प्रकल्पातून ३०० मनुष्यबळ रोजगारनिर्मिती होणार आहे.

महाराष्ट्राने २०२३ मध्ये आणलेले अक्षय ऊर्जा धोरण विशेष उपयोगी ठरणारे असून राज्याच्या हितासाठी दूरगामी परिणाम करणारा आणि काळाच्या पुढचा विचार या धोरणात झाला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य उपयोग आणि पर्यावरण पूरक असलेल्या उदंचन जलविद्युत प्रकल्पात वारणा समूह सक्रिय सहभाग घेऊन प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देईल. - आमदार विनय कोरे