वारणेतील ‘एटीएम’ दुसऱ्यांदा फोडल

By Admin | Updated: August 6, 2014 00:41 IST2014-08-06T00:32:44+5:302014-08-06T00:41:01+5:30

रोकड सुरक्षित : एटीएम मशीन पळविण्याचा प्रयत्ने

'WARAN' ATM will be played for a second time | वारणेतील ‘एटीएम’ दुसऱ्यांदा फोडल

वारणेतील ‘एटीएम’ दुसऱ्यांदा फोडल

वारणानगर : अमृतनगर (ता. पन्हाळा) येथे ‘बॅँक आॅफ इंडिया’चे एटीएम सेंटर काल, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्याची खळबळजनक घटना आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सहा महिन्यांत दुसऱ्यांदा हे एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, चोरट्यांनी एटीएम मशीन उचकटून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरल्याने एटीएममधील रोकड सुरक्षित राहिली. एटीएम मशीन व कॅश बॉक्स चोरट्यांनी तेथेच टाकून पलायन केले. चोरट्यांनी फोडलेल्या एटीएम मशीनसह सेंटरचे सुमारे तीन लाखांवर नुकसान झाले असून, या घटनेने वारणा कोडोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वारणानगर-अमृतनगर रस्त्यावर अमृतनगर फाटा येथे बॅँक आॅफ इंडियाने ई.पी.एस. मुंबई या कंपनीचे हे एटीएम सेंटर चालविण्यास दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी चोरट्यांनी हेच एटीएम सेंटर फोडून रोकड व एटीएम मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. अवघ्या सहा महिन्यानंतर पुन्हा तेच एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडले. एटीएम सेंटर फोडल्याची घटना कोडोली पोलिसांत कळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व सहकारी बबन मोहोंडुळे, अर्जुन घनवट व पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
चोरट्यांनी या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून सर्वप्रथम मशीनचे सर्व वायरिंग उचकटून काढले. त्यानंतर एटीएम मशीन लोखंडी हत्याराने उचकटून रकमेसह मशीनच उचलून बाहेर आणले. मशीनचे वजन जास्त असल्याने चोरट्यांना हे मशीन उचलून नेण्यात अपयश आले. शिवाय मशीन फोडून रक्कम नेण्याचा त्यांचा प्रयत्नही फसला. अखेर चोरट्यांनी एटीएम मशीन रस्त्यावरच टाकून पलायन केल्याचे आढळले.
आज सकाळी बॅँक आॅफ इंडिया, अमृतनगर शाखेचे मॅनेजर भुवनेश्वर दास, कर्मचारी विकास चौगुले यांनी भेट देऊन पाहणी केली. ई.पी.एस.कंपनीचे चॅनेल मॅनेजर प्रशांत तवंदीकर यांनी या घटनेची फिर्याद दिली.
दरम्यान, कोडोली पोलिसांना एटीएम सेंटवरचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, चोरट्यांनी चारचाकी वाहनांचा वापर केला असावा, असा अंदाज असून त्यादृष्टीने तपासाची पुढील दिशा ठरवल्याचे स. पो. नि. शरद मेमाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'WARAN' ATM will be played for a second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.