मुस्लीम बोर्डिंगमध्ये आज वक्फ बाेर्डाची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST2021-09-25T04:23:54+5:302021-09-25T04:23:54+5:30
कोल्हापूर : दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंग हॉलमध्ये आज, शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार यावेळेत वक्फ बोर्डाच्या कार्यशाळेचे आयोजन ...

मुस्लीम बोर्डिंगमध्ये आज वक्फ बाेर्डाची कार्यशाळा
कोल्हापूर : दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंग हॉलमध्ये आज, शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार यावेळेत वक्फ बोर्डाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुस्लीम बोर्डिंगतर्फे देण्यात आली.
या कार्यशाळेत मस्जिद, मदरसा, दर्गा व कब्रस्तान असणाऱ्या संस्थांची वादविवाद रहीत जी प्रकरणे वक्फ बोर्डाकडे प्रलंबित आहेत. त्यामधील कागदपत्रांची पूर्तता करणे, नोंदणी प्रस्ताव दाखल करणे, संस्थांची स्कीम दाखल करणे, प्रलंबित स्कीम व बदल अर्जामधील अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे इत्यादी बाबीवर कार्यशाळेत कार्यवाही आहे. कार्यशाळेस राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय वक्फ अधिकारी पुणे उपस्थित असणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वक्फ संस्थांचा एक प्रतिनिधी सर्व दप्तरानिशी कार्यशाळेत यावा व कार्यशाळेचा सर्व वक्फ संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक ॲड. जावेद फुलवालेे, ॲड. इम्रान इनामदार, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन, गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, ॲड. खदिजा सनदी, ॲड. सैफ फकीर यांनी केले आहे.