मुरगूड शहरात गरजूंसाठी माणुसकीची भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:37+5:302021-02-23T04:37:37+5:30

या ठिकाणी जुने, पण चांगले साहित्य कपडे स्वीकारले जात आहेत. हेच कपडे साहित्य गरिबांना दिले जाणार आहे. या उपक्रमाचा ...

A wall of humanity for the needy in the city of Murgud | मुरगूड शहरात गरजूंसाठी माणुसकीची भिंत

मुरगूड शहरात गरजूंसाठी माणुसकीची भिंत

या ठिकाणी जुने, पण चांगले साहित्य कपडे स्वीकारले जात आहेत. हेच कपडे साहित्य गरिबांना दिले जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ नगराध्यक्ष राजेखान जमादार मुख्याधिकारी संजय गायकवाड आदींच्याहस्ते करण्यात आला. स्वावलंबी महिला शहरस्तरीय संघ या संस्थेच्या महिला बचत गटांनी बनविलेल्या गृहोपयोगी वस्तू व खाद्यवस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना काम, रोजगार मिळावा यासाठी स्वावलंबी महिला होम मेड शॉपीची स्थापना करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत शहरातील सर्व महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ७५ बचत गटातील ७५० महिलांमधून ११ निवडक होतकरू महिलांना घेऊन हा स्वावलंबी महिला शहरस्तरीय संघ स्थापन करण्यात आला आहे व त्यांच्यामार्फत शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे, नगरसेविका रूपाली सणगर, रेखा मांगले, अनुराधा राऊत, सुप्रिया भाट, प्रतिभा सूर्यवंशी, रंजना मंडलिक, वर्षा मेंडके, संगीता चौगले, समुदाय संघटिका रेश्मा चौगले, कार्यालय अधीक्षिका स्नेहल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

फोटो ओळ :-

मुरगूड, ता. कागल येथे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा शुभारंभ करताना मुख्याधिकारी संजय गायकवाड, शेजारी नगराध्यक्ष राजेखान जमादार व अन्य महिला.

Web Title: A wall of humanity for the needy in the city of Murgud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.