मानसशास्त्र विषयात प्रतीक्षा आंबी मुक्त विद्यापीठात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST2021-05-19T04:25:17+5:302021-05-19T04:25:17+5:30
मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र महावीर महाविद्यालयामध्ये आहे. या केंद्राची प्रतीक्षा ही विद्यार्थिनी आहे. तिने सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात ...

मानसशास्त्र विषयात प्रतीक्षा आंबी मुक्त विद्यापीठात प्रथम
मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र महावीर महाविद्यालयामध्ये आहे. या केंद्राची प्रतीक्षा ही विद्यार्थिनी आहे. तिने सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात बी. ए. मानसशास्त्र विषयात प्रथम क्रमांक पटकविला आहे. याबद्दल तिला मुक्त विद्यापीठाकडून वेणूताई चव्हाण पारितोषिक आणि वंदना वसंत पुरोहित पारितोषिक मिळाले आहे. तिला प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, केंद्र संयोजक डॉ. महादेव शिंदे, केंद्र सहायक बसवराज वस्त्रद, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. भरत नाईक, विजयकुमार मुत्नाळे, इम्रान शेख-मुजावर, संतोष तपकिरे याचे मार्गदर्शन लाभले. ॲड. के. ए. कापसे, सेक्रेटरी एम. बी. गरगटे यांचे प्रोत्साहन लाभले.
फोटो (१८०५२०२१-कोल-प्रतिक्षा आंबी (महावीर कॉलेज)
किरण ननवरे यांना पीएच.डी.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने किरण ननवरे यांना शिक्षणशास्त्र या विषयातील पीएच.डी. जाहीर केली. त्यांनी ‘भावी शिक्षकांच्या उपयोजित मराठी लेखन कौशल्य विकासासाठी कार्यक्रमाची निर्मिती व त्याची परिणामकारकता - एक अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शोभा काळेबाग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन केले. आंबेगावे (पुणे) येथील अभिनव शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये गेल्या १५ वर्षांपासून अध्यापन करीत आहेत. त्यांना राजीव जगताप, सुनीता जगताप, डॉ. कांचन चौधरी यांचे सहकार्य लाभले.
फोटो (१८०५२०२१-कोल-किरण ननवरे (पीएचडी)
===Photopath===
180521\18kol_6_18052021_5.jpg
===Caption===
फोटो (१८०५२०२१-कोल-किरण ननवरे (पीएचडी)