‘जोतिबा’वरील चौकी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: December 16, 2014 23:50 IST2014-12-16T22:50:59+5:302014-12-16T23:50:58+5:30

भाविक, नागरिकांतून विचारणा : ५० लाख रुपये खर्च, ग्रामस्थांची होणार सोय

Waiting for the opening of the Jotiba post | ‘जोतिबा’वरील चौकी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

‘जोतिबा’वरील चौकी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

जोतिबा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर ५० लाख रुपये खर्च करून बांधलेली पोलीस चौकी व पोलीस निवासाची इमारत गेले कित्येक दिवस उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पोलीस चौकी कधी सुरू होणार, याबाबत भाविक व नागरिकांतून विचारणा होऊ लागली आहे.
श्री क्षेत्र जोतिबा डोंगराला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. गर्दीमुळे येथे होणाऱ्या चोऱ्या, चेंगराचेंगरी, अपघात, तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी खास बाब म्हणून जोतिबा डोंगराला २०१२ला पोलीस चौकी मंजूर झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१३ ते २०१४ या कालावधीत ५० लाख रुपये खर्चाची पोलीस चौकी व पोलीस निवासाची इमारत बांधून पूर्ण केली. ही इमारत पोलीस विभागाकडे वर्ग केली आहे. याठिकाणी एक पोलीस निरीक्षक व १० पोलीस कर्मचारी असणार आहेत. यात्रा काळात पोलिसांची निवासाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती. आता नूतन इमारत झाल्यामुळे पोलिसांना निवारा मिळणार आहे.
जोतिबा डोंगरावर घडणाऱ्या दुर्घटनांची फिर्याद भाविकांना व स्थानिक नागरिकांना १५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कोडोली पोलीस ठाण्याला जावे लागत होते. आता याचठिकाणी सोय होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, चौकीचे उद्घाटन होणे गरजेचे आहे.


इमारतीसमोरील रस्ता व सभोवतालचे कुंपनाचे काम राहिल्यामुळे उद्घाटन करण्यास विलंब होत असल्याचे कोडोलीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.

Web Title: Waiting for the opening of the Jotiba post