‘गडहिंग्लज’ फायर स्टेशनला उद्घाटनाची प्रतीक्षा!

By Admin | Updated: December 10, 2014 23:58 IST2014-12-10T23:23:27+5:302014-12-10T23:58:37+5:30

गाडीसाठी प्रस्ताव : कर्मचारी निवासासह सुसज्ज फायर स्टेशन

Waiting for the opening of 'Gadhinglj' fire station! | ‘गडहिंग्लज’ फायर स्टेशनला उद्घाटनाची प्रतीक्षा!

‘गडहिंग्लज’ फायर स्टेशनला उद्घाटनाची प्रतीक्षा!

राम मगदूम - गडहिंग्लज -गडहिंग्लज शहर व परिसराला अग्निशमन सेवा सक्षमपणे पुरविण्यासाठी नगरपालिकेने सुसज्ज फायर स्टेशन बांधले आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासह अग्निशमन गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे. सुमारे ५६ लाख रुपये खर्चून बांधलेले हे फायर स्टेशन अजून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
१९७९ पासून नगरपालिकेतर्फे अग्निशमन सेवा सुरू झाली. स्वतंत्र फायर स्टेशन नसल्यामुळे नगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला तात्पुरत्या शेडमध्येच अग्निशमन गाडी व कर्मचारी तैनात असतात. गडहिंग्लज शहर व परिसरासह नजीकच्या आजरा, चंदगड, भुदरगड व कागल तालुक्यांतदेखील संकटकालीन सेवा पुरविली जाते. प्रशिक्षित व पुरेसे कर्मचारी नसतानाही गडहिंग्लजसह सीमाभागातील आगीच्या घटना आणि आपत्तकालीन परिस्थितीत या विभागाने मोलाची कामगिरी बजावली आहे.
गडहिंग्लज तालुक्याचे सुपुत्र आणि वडाळा फायर स्टेनशनचे सेवानिवृत्त प्रमुख राष्ट्रपतिपदक विजेते शामराव शिंदे यांच्या सहकार्याने फायर स्टेशनसाठी भरीव निधी मिळाला आहे. आता नवीन अग्निशमन गाडी व अत्याधुनिक उपकरणे मिळाल्यानंतर हे फायर स्टेशन खऱ्या अर्थाने सुसज्ज होईल.

फायर स्टेशनमधील किरकोळ कामे संपल्यानंतर त्याचे उद्घाटन करण्यात येईल. नवीन गाडी व रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच अत्याधुनिक उपकरणांसह फायर स्टेशन लवकरच जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केले जाईल.
- कावेरी चौगुले,
उपनगराध्यक्षा, गडहिंग्लज.



आपल्या कारकिर्दीतच फायर स्टेशनसाठी ४० लाखांचा निधी मिळाला. अग्निमशन गाडी खरेदीचा ३० लाखांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यास मंजुरी मिळविण्याबरोबरच लक्ष्मी यात्रेपूर्वी फायर स्टेशन जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे.
- राजेंद्र मांडेकर,
माजी नगराध्यक्ष, गडहिंग्लज


२४ तास सेवा देण्यासाठी
सुपरवायझर-१, लिडिंग फायरमन-३, असिस्टंट फायरमन-६, वाहनचालक-३ अशा १३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, या विभागाकडे चारच कायम कर्मचारी आहेत. नवीन नोकरभरतीवर बंद आहे. ६ कर्मचारी ठेका पद्धतीवर घेण्यात आले आहेत.

अग्निशमन विभागासाठी ब्रिथिंग अ‍ॅपरेटस, होज पाईप, होज कपलिंग, फोम ब्रँचेस, पोेर्टेबल फायर पंप, हेड लॅम्प, जॅकस, रेस्क्यू ट्यूल्स या अत्याधुनिक उपकरणांची गरज आहे. नवीन फायर स्टेशनच्या विद्युतिकरणासह या उपकरणांसाठी पाच लाखांच्या निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

खातेप्रमुखपदच रिक्त : अत्यावश्यक सेवेतील अग्निशमन पर्यवेक्षक हे खातेप्रमुखपदच रिक्तआहे. आकृतिबंधाप्रमाणे सुपरवायझर १, लिडिंग फायरमन १, असिस्टंट फायरमन - ३, वाहनचालक-२ अशा एकूण ७ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सातपैकी ३ जागा रिक्त आहेत.

Web Title: Waiting for the opening of 'Gadhinglj' fire station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.