तीन महिन्यांपासून ‘बीडीओं'ची प्रतीक्षा

By Admin | Updated: December 16, 2014 00:13 IST2014-12-15T20:54:38+5:302014-12-16T00:13:33+5:30

शिरोळ पं. समिती : नियमित अधिकारी कधी ़?

Waiting for 'Bidi' for three months | तीन महिन्यांपासून ‘बीडीओं'ची प्रतीक्षा

तीन महिन्यांपासून ‘बीडीओं'ची प्रतीक्षा

शिरोळ : खासदार शेट्टी व आमदार उल्हास पाटील यांच्या शिरोळ पंचायत समितीला गेल्या तीन महिन्यांपासून नियमित गटविकास अधिकारी (बीडीओ) नाही. सहायक गटविकास अधिकाऱ्यांकडे सध्या पदभार देण्यात आला आहे. यामुळे शिरोळला नियमित बीडीओ केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
शिरोळ पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी वर्ग-१ चे पद आहे. सप्टेंबर २०१४ पासून हे पद रिक्त आहे. सध्या हा पदभार सहायक गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. गटविकास अधिकारी नाहीत म्हणून काम थांबले, असे जरी नसले, तरी ज्या उद्देशाने वर्ग-१ ची पदे या जागी निर्माण करण्यात आली, त्याचे काय ? हा प्रश्न आहे. पंचायत समिती ही तालुका पातळीवरील सर्वांत मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामीण भागातील अनेक योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जातात. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुका संवेदनशील आहे. खासदार शेट्टी व आमदार उल्हास पाटील हे दोघेही शिरोळचेच आहेत. सध्या पंचायत समितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता आह, असे असताना शिरोळला नियमित गटविकास अधिकारी का मिळत नाही, हा प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for 'Bidi' for three months