शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वहिफणी कामगाराचा लाथाबुक्क्यांनी मारून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 10:34 IST

Crime News Police Kolhapur- खोतवाडी (ता.हातकणंगले) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर सायकल चोरल्याच्या संशयावरून एका वहिफणी कामगाराचा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला. अलीम रशिद गदवाल (वय ३८, रा. सोडगे मळा, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अल्ताफ शेख (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) या यंत्रमाग कारखानदारास शहापूर पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देसायकल चोरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण एका यंत्रमाग कारखानदारास अटक

इचलकरंजी : खोतवाडी (ता.हातकणंगले) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर सायकल चोरल्याच्या संशयावरून एका वहिफणी कामगाराचा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला. अलीम रशिद गदवाल (वय ३८, रा. सोडगे मळा, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अल्ताफ शेख (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) या यंत्रमाग कारखानदारास शहापूर पोलिसांनी अटक केली.याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गत आठवड्यात अल्ताफ शेख याची सायकल चोरीला गेली. त्याने परिसरात शोध घेवूनही त्याला सायकल सापडली नाही. चौकशीमध्ये अलीम गदवाल याने सायकल चोरून विकल्याची माहिती अल्ताफ याला समजली.

यामुळे त्याने अलीम याच्याकडे सोमवारी (दि.१५) रात्री विचारणा केली. त्यावेळी अलीम हा मद्यधुंद अवस्थेत होता. उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने संतप्त झालेल्या अल्ताफ याने अलीमला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अलीमचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.मंगळवारी सकाळी ४० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना प्राथमिक चौकशीत मृतदेह अलीम याचा असल्याचे समजले. तसेच रात्री अलीम व अल्ताफ यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली.

पोलिसांना सुगावा लागल्याचे समजताच अल्ताफ याने पलायन केले. पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्याला अटक केली. दरम्यान, अलीम याच्या पत्नीने शहापूर पोलिस ठाण्यात अल्ताफ याच्यासह इतर साथीदारांनी सायकल चोरीच्या संशयावरून ठार मारल्याची तक्रार दिली आहे. त्यामध्ये अल्ताफ याने अलीम याची पत्नी जयदा यांना फोन करून तुझ्या पतीने सायकल चोरली असून, दोन सायकलींचे पैसे द्यावे लागतील; अन्यथा त्याला मारणार, अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीichalkaranji-acइचलकरंजीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर