अखेर वडगावला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालेच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:09+5:302021-05-05T04:41:09+5:30
तत्कालीन मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे यांची पिंपरी-चिंचवडच्या साहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली होती. मात्र मुख्याधिकारी न देताच प्रभारींवर वडगावचा भार ...

अखेर वडगावला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालेच...!
तत्कालीन मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे यांची पिंपरी-चिंचवडच्या साहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली होती. मात्र मुख्याधिकारी न देताच प्रभारींवर वडगावचा भार देण्यात आला होता. पालिकेला सक्षम अधिकारी नसल्याने पालिका प्रशासनात विस्कळीतपणा आला. परिणामी, शहरातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढली झाली. धोरणात्मक निर्णय, उपाययोजना करता येईनात अशी परिस्थिती होती. या पार्श्वभूमीवर अखेरीस देसाई हजर झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथील असणारे देसाई यांनी वसई, विरार महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त, उपायुक्तपदी काम केले आहे. त्यानंतर कामठी, अक्कलकोट, तासगाव, जत, आदी ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील मुख्याधिकारी कार्यालयातील पालिकेचे प्रशासनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी स्वच्छता अभियान, कोरोनाकाळात पालिकेत असताना कारवाईचा धडाका लावला होता.