वीज बिले माफ करावीत यासाठी बुधवारी वडगाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:56+5:302020-12-05T04:53:56+5:30
लॉकडाऊन काळातील घरगुती वीजग्राहकांचे वीज सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. ...

वीज बिले माफ करावीत यासाठी बुधवारी वडगाव बंद
लॉकडाऊन काळातील घरगुती वीजग्राहकांचे वीज सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. यापूर्वी धरणे आंदोलन, टाळा ठोक अशी आंदोलने केली पण महाविकास आघाडी सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे पुढचा टप्पा म्हणून साखळी पद्धतीने ‘गाव बंद आंदोलन’ सुरू करणार असल्याचा इशारा बाबासोा पाटील-भुयेकर व इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला होता. त्यानुसार आज वडगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते.
या बैठकीस जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, नगरसेवक जवाहर सलगर, भाजपा तालुकाध्यक्ष धनंजय गोंदकर, प्रज्योत शहा, शिवाजी शिंदे, सदाशिव कुलकर्णी, महावीर पाटील,उत्तम पाटील, संतोष पाटील, जिनेंद्र देसाई आदी उपस्थित होते. भाजप शहराध्यक्ष जगन्नाथ माने यांनी आभार मानले.