नगरसेवकांच्यावतीने विशेष सभा घेण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेची विशेष सभा महालक्ष्मी मंगलधाम येथे घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते.
यावेळी संतोष गाताडे, अजय थोरात यांनी झालेल्या चर्चेत मते मांडली.
या चर्चेच्या समारोपप्रसंगी नऊ वर्षांपासून अपेक्षित प्रतिसाद न देणाऱ्या व विकास आराखडा करण्यासाठी प्रतिसाद न देणाऱ्या नवनिर्माण कन्सल्टंट, पुणेचा ठेका रद्द करीत आहोत, त्याऐवजी उर्वरित विकास आराखड्याचे काम मोनार्च एस अँड ई कन्सल्टंट, पुणे हे पूर्ण करणार आहेत. विशेष सभेत हे दोन्ही ठराव एकमताने करण्यात आले.
यावेळी शरद पाटील,संदीप पाटील, जवाहर सलगर, गुरूप्रसाद यादव, सावित्री घोटणे, शबनम मोमीन, नम्रता ताईगडे, मैमून कवठेकर, अलका गुरव, संगिता मिरजकर, अनिता चव्हाण आदी उपस्थित होते. विषय पत्रिकेचे वाचन सुरेश भोपळे यांनी केले.