वडगावात ६६ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:25+5:302021-07-19T04:16:25+5:30
पेठवडगाव : ‘लोकमत’ व विजयसिंह यादव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव यांच्या जयंतीनिमित्त ...

वडगावात ६६ जणांनी केले रक्तदान
पेठवडगाव : ‘लोकमत’ व विजयसिंह यादव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव यांच्या जयंतीनिमित्त येथील बळवंतराव यादव हायस्कूल येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. ६६ रक्तदात्यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये महिलासुद्धा सहभाग झाल्या होत्या.
शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा विजयादेवी यादव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ होते.
प्रास्ताविक माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, डाॅ. अशोक चौगुले, रणजितसिंह यादव, अमेय केर्लेकर, सचिन पाटील, जयकुमार गणपते, निवास धनवडे, अजित पाटील, कमलेश शिरवडेकर, संतोष पुरोहित, प्रथमेश महाजन, चंद्रकांत परीट, राज कोळी, नितीन कुचेकर, नितीन सणगर, दीप्ती शेटे, पूजा लोले, असिफ पिरजादे, कपिल हुकेरी, प्रतीक हुकेरी, राहुल माने, आदी प्रमुख उपस्थित होते. सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या वडगावसह परिसरातील अनेकांनीही रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘लोकमत’चे वसुली प्रतिनिधी संतोष मिणचेकर, दिलीप चरणे, नाना जाधव, आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिजित गायकवाड, सुहास जाधव यांचे सहकार्य लाभले.
सचिन रामचंद्र पाटील यांनीही आतापर्यंत २७, तर सेंट्रिंग काँट्रॅक्टर हरिदास कांबळे यांनी आतापर्यंत दर चार महिन्यांनी २० वेळा रक्तदान केले. नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिरात भारतीय सेनादलात तमिळनाडू येथे कार्यरत असलेले योगीराज कार्वेकर यांनी १२ वेळा रक्तदान केले आहे.
फोटो कॅप्शन १८ वडगाव
पेठवडगाव येथील बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये लोकमत व विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विजयादेवी यादव यांच्या हस्ते, तर माजी नगराध्यक्ष विद्या पोळ, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी उपनगराध्यक्ष डाॅ. अशोक चौगुले, अभिजित गायकवाड, सुहास जाधव, आदी उपस्थित होते.