इतिहासाची जपणूक करणारा ‘वडार’ समाज

By Admin | Updated: June 1, 2015 00:16 IST2015-05-31T23:51:45+5:302015-06-01T00:16:43+5:30

पारंपरिक उद्योग, व्यवसायात नावलौकिक : स्त्रियांचीही कामे पुरुषांइतकीच कष्टाची; दगडापासून उपयुक्त वस्तू बनवू शकणारा वर्ग --लोकमतसंगे जाणून घेऊ

The 'Wadar' community that carries history's history | इतिहासाची जपणूक करणारा ‘वडार’ समाज

इतिहासाची जपणूक करणारा ‘वडार’ समाज

प्रदीप शिंदे- कोल्हापूर -वेगवेगळ्या काळांचा इतिहास वडार समाजाने केलेल्या बांधकाम वास्तूंच्या अवशेषांतूनच समजतो. त्यांचे कौशल्य किती उच्चदर्जाचे होते याचे पुरावे तर ठायी-ठायी मिळतात. हाच वडार समाज पारंपरिक उद्योग, व्यवसायात नावलौकिक मिळवून सर्व समाजाच्या विकासास हातभार लावत आहे. स्त्रियाही पुरुषांइतकीच कष्टाची कामे करतात. त्यादृष्टीने पाहिल्यास वडार समाजाचा इतिहास गौरवशाली आहे.
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला, तरी तो आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळतो. प्रत्येक प्रदेशातील भाषाभेदामुळे या समाजाला वेगवेगळी नावे मिळालेली दिसतात. महाराष्ट्रात ‘वडार’ म्हणत असले तरी कर्नाटकात त्यांनाच ‘वड्डर’ म्हणून ओळखले जाते. आंध्रात याच समाजाला ‘वड्डोल्लु’ वा ‘ओड्डर’ असे म्हटले जाते, तर तमिळनाडूत ‘ओट्टन नायकन वा ओड्डर’ म्हणून ओळखले जाते. गुजरात व उत्तरेतील इतर राज्यांत त्यांना ‘ओड अथवा ओडिया’ म्हणून ओळखले जाते. मूळचा वड्डार समाज हा ओडिसा व आंध्र प्रांतातील. हा समाज व्यवसायानिमित्त इतरत्र विस्तारला.
पुरातन काळीच दगडापासून उपयुक्त वस्तू बनवू शकणारा वर्ग उदयाला आला होता. जाते हे साध्या प्रकारचे दळण्याचे यंत्र. पाषाणकार्यात अनेक प्रकार आल्याने त्या-त्या कामात प्रावीण्य मिळविणाऱ्यांच्या ‘मण्ण’ अथवा ‘माती वडार’, ‘गाडीवडार’, पाथरवट, ‘कल्ल वडार’ या पोटजाती बनल्या.
वडार समाज दगडाशी नाळ जोडलेला. आजपर्यंतचे शिल्पवैभव निर्माण केले ते या वडार समाजाच्या पाषाणकौशल्यामुळेच. समाजाने आता शिक्षणाची कास धरली. समाजातील राज्य वडार समाज अध्यक्ष जनार्दन पोवार, मजदूर संघाचे माजी अध्यक्ष मुकंद पोवार, इचलकरंजीचे नगरसेवक तानाजी पोवार, मी वडार संघटनेचे विजय चौगुले आदी मान्यवर समाजातील मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी प्रवृत्त करीत आहेत.

Web Title: The 'Wadar' community that carries history's history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.