वडणगेला निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:23+5:302021-02-05T07:07:23+5:30
वडणगे : शिव-पार्वती तलावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून वडणगेच्या विकासकामास निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. ...

वडणगेला निधी कमी पडू देणार नाही
वडणगे : शिव-पार्वती तलावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून वडणगेच्या विकासकामास निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. पी.एन. पाटील यांनी दिली. ते बी.एच. दादा युवक मंचच्या वतीने आयोजित सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्कार व युवक मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब देवणे होते.
तत्पूर्वी वडणगेसाठी एका वर्षात ८३ लाखांचा निधी दिल्याबद्दल आ. पाटील यांचा मंचच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वंदना पाटील व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल संपदा नांगरे यांना सह्याद्री प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब खाडे, भैया पाटील (भुयेकर), बी. एच. पाटील, बी. के. जाधव, के.स. पाटील, दिलीप जाधव, सरपंच सचिन चौगुले, सेवा संस्थेचे सभापती आनंदराव पाटील, सुशील शिंदे, हंबीरराव वळके, केवलसिंग रजपूत, माजी अध्यक्ष महादेव पाटील, मंचचे अध्यक्ष युवराज साळोखे, उपाध्यक्ष सतीश चेचर उपस्थित होते.
फोटो २९ वडणगे पाटील
ओळी :- वडणगे, ता. करवीर येथील बी.एच. दादा युवक मंचच्या वतीने सह्याद्री महिला प्रेरणा पुरस्काराचे वितरण करताना आ. पी. एन. पाटील, बाळासाहेब खाडे, भैया पाटील, बी.एच. पाटील, बी.के. जाधव, आण्णासाहेब देवणे,
आनंदराव पाटील, सचिन चौगले, केवलसिंग रजपूत आदी.