बाजार समितीसाठी आज मतदान

By Admin | Updated: July 12, 2015 00:16 IST2015-07-12T00:15:24+5:302015-07-12T00:16:55+5:30

६२ मतदान केंद : तिन्ही आघाड्यांची तयारी

Voting for the Market Committee today | बाजार समितीसाठी आज मतदान

बाजार समितीसाठी आज मतदान

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत सात तालुक्यांतील ६२ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शनिवारी सकाळी मतदान केंद्रांवर सर्व साहित्य रवाना केले. विकास संस्था, ग्रामपंचायत, अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार, पणन प्रक्रिया या गटांत २१७५२ मतदान आहे.
राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीचे ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास,’ कॉँग्रेसप्रणीत ‘राजर्षी शाहू’ व शिवसेना-भाजपची ‘शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी’ अशी तिरंगी लढत होत आहे. संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी ११० उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोल्हापूर शहरातील सात, करवीरमधील सहा, कागलमधील दोन, पन्हाळा येथील सहा, शाहूवाडीमधील दोन, राधानगरीमधील चार, भुदरगडमधील पाच, तर गगनबावडा तालुक्यातील दोन केंद्रे अशा ६२ केंद्रांवर मतदान होणार आहे.
सत्ता स्थापन करण्यासाठी गेले महिनाभर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचे रान उठविले होते. माघार व मतदान यांमध्ये महिन्याचा कालावधी असल्याने उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहोचले. सोशल मीडियाचा वापरही प्रभावीपणे केला आहे. क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता असल्याने प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहे.
मंगळवारी (दि. १४) सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Voting for the Market Committee today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.