शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

LokSabha2024: उन्हाच्या तडाख्यातही कोल्हापूरकरांनी मतदानासाठी लावल्या रांगा, 'दक्षिण'मतदारसंघात प्रचंड उत्साह

By पोपट केशव पवार | Published: May 07, 2024 12:32 PM

सेल्फी पॉईंटवर मतदारांची गर्दी

कोल्हापूर : एकीकडे उन्हाच्या चटक्याने राज्यभरात मतदानाची टक्केवारी घटत असली तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार मात्र, भर उन्हातही रांगा लावून मतदान करत असल्याचे चित्र मंगळवारी गावागावात पाहायला मिळत आहे. शहरात ३३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान आहे.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आज मंगळवारी मतदान सुरु आहे.  मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावागावांमधील प्रत्येक मतदान केंद्रांवर रांगा लावून नागरिक मतदान करत आहेत. कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावरील शीलादेवी शिंदे सरकार हायस्कूल केंद्रावर सकाळी सातपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. उन्हाच्या आधी मतदान करुन जाण्यासाठी या केंद्रावर अकरा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी झाली. मतदारांना उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. साळोखेनगर येथील शिवशक्ती विद्यालयातील मतदान केंद्रावरही मोठी गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे दुपारी १२ वाजेपर्यंत या केंद्रावरील गर्दी कमी झाली नाही. पाचगावमध्ये तिन्ही केंद्रे मतदारांच्या गर्दीने फुलून गेली. येथील पाचगाव विद्यामंदिर केंद्रावर दिव्यांग मतदारांचे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आर.के.नगरमध्येही मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. उजळाईवाडी येथील विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्रावरही प्रचंड गर्दी होती.

सेल्फी पॉईंटवर मतदारांची गर्दी

प्रशासनाच्यावतीने सेल्फी पॉईंट करण्यात आला असून मतदान झाल्यानंतर मतदार सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत. या केंद्रावर मतदारांना मंडपासहित बसण्यासाठी खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गांधीनगर येथे तीन मतदान केंद्र असून या सर्वच केंद्रांवर दुपारी १२ वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली होती. सरनोबतवाडी येथे एकच मतदान केंद्र असले तरी सकाळी सातपासूनच सरनोबतवाडीकरांनी चुरशीने मतदान केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान