आपल्या आवडत्या रेस्टॉरंटकरिता व्होट करा
By Admin | Updated: July 29, 2016 01:07 IST2016-07-29T00:45:06+5:302016-07-29T01:07:11+5:30
टेस्टला बनवा बेस्ट : ‘लोकमत’च्या ‘कोल्हापूर नंबर वन फूड अवॉर्डस्’साठी मत द्या...

आपल्या आवडत्या रेस्टॉरंटकरिता व्होट करा
कोल्हापूर : ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘कोल्हापूर नंबर वन फूड अवॉर्डस्’ या आगळ्यावेगळ्या विशेष स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या रेस्टॉरंटकरिता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. १0 आॅगस्टपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.
कोल्हापूरच्या खाद्यपदार्थांच्या चवीला रुबाबदार बनविण्यासाठी आवडत्या रेस्टॉरंटकरिता मतदान करण्याची कोल्हापूरकरांना यामुळे संधी मिळालेली आहे.
या स्पर्धेत सहा अवॉर्ड कॅटॅगरीज्साठी मतदान करता येणार आहे. यामध्ये नंबर वन मिसळ रेस्टॉरंट, नंबर वन चायनीज रेस्टॉरंट, नंबर वन फास्ट फूड रेस्टारंट, नंबर वन पंजाबी रेस्टॉरंट, नंबर वन थाळी रेस्टॉरंट आणि नंबर वन लोकप्रिय रेस्टॉरंट या कॅटॅगरीज्साठी मतदान करण्याचे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. सहा अवॉर्ड कॅटॅगरीज्मध्ये सहभागी झालेल्या रेस्टॉरंटस्साठी प्रत्येक अवॉर्ड कॅटॅगरीज्ला कोड दिला आहे. तो स्वतंत्रपणे ५६७६७0२
या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. (प्रतिनिधी)