स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:17 AM2021-06-19T04:17:56+5:302021-06-19T04:17:56+5:30

राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह समरजित घाटगे यांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या ...

The voice will be raised in the assembly to give justice to the students of the competitive examination | स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार

Next

राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह समरजित घाटगे यांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या. ‘एमपीएससी’मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्रे तातडीने द्या, असे न्यायालयीन आदेश असतानासुद्धा राज्य शासनाने या नियुक्त्या केलेल्या नाहीत. सुमारे २१८५ विद्यार्थी हक्काच्या नोकरीपासून वंचित आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा दोन-दोन वर्षांपासून हे विद्यार्थी न्यायासाठी झगडत आहेत. शैक्षणिक प्रवेश, सवलतीमध्ये आम्हाला न्याय द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी यावेळी केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सविस्तर समजून घेतल्या. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण निश्चितपणे विधानसभेत आवाज उठवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. सुपर न्युमररीचा पर्याय वापरून शासनाने या सर्व विद्यार्थ्यांना सामावून घ्यायला हवे, असे सांगत यासाठी मी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करेन असेही त्यांनी सांगितले.

फोटो (१८०६२०२१-कोल-समरजित घाटगे निवेदन) : मुंबई येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.

छायाचित्र- मुंबई येथे एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी त्यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे.

Web Title: The voice will be raised in the assembly to give justice to the students of the competitive examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.