विद्यापीठ युवा महोत्सवात विवेकानंद, न्यू कॉलेजचे वर्चस्व
By Admin | Updated: October 9, 2014 00:16 IST2014-10-09T00:12:42+5:302014-10-09T00:16:46+5:30
निकाल जाहीर : लोकनृत्य, लोककलामध्ये चांगली कामगिरी

विद्यापीठ युवा महोत्सवात विवेकानंद, न्यू कॉलेजचे वर्चस्व
कोल्हापूर : वादविवाद, समूहगीत, सुगम गायन, लोकनृत्य, एकांकिका, लोककला, आदी विविध स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करीत शिवाजी विद्यापीठाच्या ३४व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विवेकानंद आणि न्यू कॉलेजने वर्चस्व राखले. राजाराम महाविद्यालयात काल, मंगळवारी झालेल्या महोत्सवाचा निकाल विद्यापीठाकडून आज, बुधवारी जाहीर करण्यात आला. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांची मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे.
विजेते असे : वक्तृत्व स्पर्धा (मराठी) - विजय चौगुले (न्यू कॉलेज), राजेश पाटील (शिवाजी विद्यापीठ मराठी अधिविभाग), वैशाली गवळी (राजाराम महाविद्यालय). हिंदी- अमरजा पाटील (राजाराम), धनश्री पाटील (घाळी कॉलेज, गडहिंग्लज), सोनिया शानेदिवाण (विवेकानंद कॉलेज). इंग्रजी- श्रृजली श्रावणे (केआयटी कॉलेज), सोमेश शिंत्रे (विवेकानंद), अनुपमा कदम (भारती विद्यापीठ). वादविवाद - विवेकानंद, शिवाजी विद्यापीठ मराठी अधिविभाग, वाय. सी. वारणा महाविद्यालय. सुगम गायन - कॉमर्स कॉलेज, शिवाजी विद्यापीठ संगीतशास्त्र विभाग, अण्णासाहेब डांगे कॉलेज, हातकणंगले. समूहगीत - कॉमर्स कॉलेज, विजयसिंह यादव कॉलेज पेठवडगाव; शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी यड्राव. मूकनाट्य - विवेकानंद, न्यू कॉलेज, एन. डी. पाटील कॉलेज, मलकापूर. लघुनाटिका - विवेकानंद, राजर्षी शाहू कॉलेज, रुकडी, भारती विद्यापीठ. पथनाट्य - कॉमर्स कॉलेज, विवेकानंद, दूधसाखर महाविद्यालय, बिद्री. एकांकिका - विवेकानंद, भारती विद्यापीठ, वाय. सी. वारणा कॉलेज. लोकवाद्यवृंद - विवेकानंद, न्यू कॉलेज, आर. बी. माडखोलकर कॉलेज, चंदगड. लोककला - न्यू कॉलेज, विवेकानंद, शिवराज कॉलेज, गडहिंग्लज. उत्तेजनार्थ- व्यंकटेश कॉलेज, इचलकरंजी; राजाराम महाविद्यालय. लोकनृत्य - आजरा महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, न्यू कॉलेज. उत्तेजनार्थ - विवेकानंद. लावणी - आजरा महाविद्यालय. (प्रतिनिधी)