शिरोळ स्वीकृत नगरसेवकपदी विठ्ठल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:16 IST2021-07-10T04:16:36+5:302021-07-10T04:16:36+5:30
येथील पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आहे. स्वीकृत नगरसेवक पदाची ...

शिरोळ स्वीकृत नगरसेवकपदी विठ्ठल पाटील
येथील पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आहे. स्वीकृत नगरसेवक पदाची जागा रिक्त झाल्याने शुक्रवारी (दि. ९) ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते. एकमेव अर्ज आल्याने विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या गटाचे समर्थक म्हणून विठ्ठल पाटील मानले जातात. प्रारंभी स्वागत मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांनी केले. या वेळी नगराध्यक्ष पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षांच्या काळात सर्वांना विश्वासात घेऊन कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. या वेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक तातोबा पाटील, प्रकाश गावडे, योगेश पुजारी, कमलाबाई शिंदे, सुरेखा पुजारी, कुमुदिनी कांबळे, जयश्री धर्माधिकारी, बाबा पाटील, प्रा. आण्णासाहेब गावडे, एन. वाय. पाटील, अमर शिंदे उपस्थित होते.
फोटो - ०९०७२०२१-जेएवाय-०६-विठ्ठल पाटील