कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी दर्शन-नवऊर्जा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:42 AM2017-09-17T00:42:45+5:302017-09-17T00:44:09+5:30

कोल्हापूर : भव्य प्राचीन मंदिराचे प्रवेशद्वार, दोन्ही बाजूंना उभ्या असणाºया भव्य हत्तींच्या मूर्ती, दीपमाळ, लक्षवेधी मंगल कलश, अंबाबाईच्या कपाळावरील मळवट आणि भव्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर

 Visva-Navaraja festival at one of the 13 Godavari in Kolhapur | कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी दर्शन-नवऊर्जा उत्सव

कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी दर्शन-नवऊर्जा उत्सव

Next
ठळक मुद्दे नितीन देसाई यांची कल्पना, चंद्रकांंतदादा पाटील यांचा पुढाकार;आजपासून जिल्ह्यात रथ फिरणाररोज ९० किलोमीटरचा प्रवास करीत हा रथ या नवऊर्जा उत्सवाची माहिती सर्वत्र देणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भव्य प्राचीन मंदिराचे प्रवेशद्वार, दोन्ही बाजूंना उभ्या असणाºया भव्य हत्तींच्या मूर्ती, दीपमाळ, लक्षवेधी मंगल कलश, अंबाबाईच्या कपाळावरील मळवट आणि भव्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी होणारे दर्शन... हे वर्णन कोणत्या चित्रपटातील नसून, कोल्हापुरातील जरगनगरकडे जाणाºया निर्माण चौकामध्ये उभारलेल्या भव्य कलाकृतीचे आहे.

विख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून साकारणाºया ‘नवऊर्जा उत्सव २०१७’ या विशेष नवरात्रौत्सव कार्यक्रमाचे २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम होत असून, त्यांनीच शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनावेळी देसाई यांच्यातील कलात्मक ताकदीची कल्पना आम्हांला आली होती. अंबाबाईची सेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आम्ही त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले आणि ४५ ट्रक साहित्य घेऊन हा माणूस कोल्हापुरात आला आहे. कोल्हापुरातील १३ देवतांचे एका ठिकाणी भाविकांना दर्शन या ठिकाणी होणार आहे. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम आणि रोज संध्याकाळी पाच ते आठ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. या निमित्ताने जिल्हाभर फिरणाºया रथाचेही उद्घाटन यावेळी मंत्री पाटील व त्यांच्या पत्नी अंजली यांनी केले.

नितीन देसाई म्हणाले, मी अंबाबाईचा भक्त आहे. माझी सेवा करण्याची इच्छा होती. माझ्या सर्व कलाकृतींच्या सादरीकरणापूर्वी मी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो आहे. बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर अशा दिग्गजांची ही नगरी आहे. सर्व देवतांचे नवरात्रामध्ये एकत्र दर्शन व्हावे, ही संकल्पना दादांना आवडलीे. या ठिकाणी किशोर सुतार यांनी साकारलेली भारतमाताही पे्ररणा देणारी आहे. सागर बगाडे यांचा बॅलेही साकारण्यात येणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेत येथे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, चारूदत्त जोशी, सुजय पित्रे, मिलिंद अष्टेकर, पारस ओसवाल उपस्थित होते.

देवी होणार प्रकट
यासाठी ३२ हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. अशा कार्यक्रमासाठी मी पहिल्यांदाच एवढा मंडप उभारत असल्याचे नितीन देसाई यांनी सांगितले. यातील देवी या भूगर्भातून हायड्रॉलिक यंत्रणेच्या माध्यमातून भाविकांसमोर प्रकट होणार आहेत.
या असतील देवी
एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, फिरंगाई, कमलजा, त्र्यंबोली, अंबाबाई, कात्यायनी, महाकाली, अनुगामिनी, गजलक्ष्मी, श्रीलक्ष्मी, तुळजाभवानी अशा १३ देवतांचे दर्शन या ठिकाणी होणार आहे. एका बाजूने जाऊन दुसºया बाजूने बाहेर येता येणार आहे. करवीरमाहात्म्य ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या या १३ देवतांबाबत यावेळी अ‍ॅड. प्रसन्न मालेकर यांनी माहिती दिली.
हेमामालिनी रद्द, माधुरीसाठी प्रयत्न
प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी या कार्यक्रमासाठी येण्याचे निश्चित झाले होते. मात्र, सुरतच्या कार्यक्रमामुळे त्यांचे येणे रद्द झाले. आता माधुरी दीक्षित-नेने यांच्यापासून अन्य अभिनेत्रींशी संपर्क साधून त्यांनी देवीसमोर सेवा सादर करावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी सुरभी हांडे (म्हाळसा भूमिकेतील) या येणार आहेत.
आजपासून रथ गावोगावी
या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी अंबाबाईची प्रतिकृती असलेला रथ तयार करण्यात आला आहे. हा रथ आता येत्या आठवड्याभरात संपूर्ण जिल्ह्यात फिरणार आहे. रोज ९० किलोमीटरचा प्रवास करीत हा रथ या नवऊर्जा उत्सवाची माहिती सर्वत्र देणार आहे.

Web Title:  Visva-Navaraja festival at one of the 13 Godavari in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.