पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेस सुभाषचंद्र भोसले यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:34 IST2020-12-30T04:34:01+5:302020-12-30T04:34:01+5:30
सुभाषचंद्र भोसले हे शासन नियुक्त नगराध्यक्ष होते. त्यावेळी ते पन्हाळा तहसीलदार म्हणूनही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे ५५ ...

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेस सुभाषचंद्र भोसले यांची भेट
सुभाषचंद्र भोसले हे शासन नियुक्त नगराध्यक्ष होते. त्यावेळी ते पन्हाळा तहसीलदार म्हणूनही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे ५५ वर्षांपूर्वी पन्हाळा कसा होता, तत्कालीन मुख्याधिकारी जाधव यांनी कोणत्या सुधारणा कराव्यात याविषयी खूपच चांगले सहकार्य केल्याचे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर आपल्या कारकिर्दीत डांबरी रस्ते तयार करण्यासाठी बर्माशेल कंपनीने खास अभियंते पाठवून डांबरी रस्ते तयार करण्याचे मार्गदर्शन केल्याचे आठवणीने सांगितले. यावेळी मुख्याधिकारी स्वरूप खारगे, पक्षप्रतोद दिनकर भोपळे, तय्यब मुजावर, रवींद्र धडेल यांनी त्यांचे स्वागत केले.
फोटो------- १९६५ ते १९६७ ला असलेले नगराध्यक्ष सुभाषचंद्र भोसले यांचे स्वागत करताना नगराध्यक्षा रूपाली धडेल, रवींद्र धडेल, दिनकर भोपळे, तय्यब मुजावर, मुख्याधिकारी स्वरूप खारगे.