अशोकराव माने इन्स्टिट्यूटला डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:32+5:302021-09-26T04:26:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअप ...

Visit of Dr. Dnyaneshwar Mule to Ashokrao Mane Institute | अशोकराव माने इन्स्टिट्यूटला डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांची भेट

अशोकराव माने इन्स्टिट्यूटला डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअप इन्कुबेशन सेंटर सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला, अशी माहिती बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली.

वाठार येथील माने इन्स्टिट्यूटला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी भेट दिली. यावेळी विविध विषयांवर संस्थाध्यक्ष विजयसिंह माने यांच्या बरोबर त्यांनी चर्चा केली.

डॉ.मुळे म्हणाले,नवनवीन विषयावर संशोधन, प्रशिक्षण ते नोकरी उपलब्ध होण्याबरोबरच उद्योजक निर्माण होण्याच्या दृष्टीने हे सेंटर महत्त्वाचे ठरणार आहे. कुशल मनुष्यबळ निर्मितीस यामुळे प्रेरणा मिळणार आहे.

विजयसिंह माने म्हणाले, कॉलेजने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाला महत्त्व देत औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले आहे. स्टार्टअप सेंटरच्या माध्यमातून जैविक जंगलापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वयित केला जाणार आहे. यामुळे विकासाचे नवे पर्व सुरू होऊन विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

शिक्षणाबरोबरच स्थानिक पातळीवर नोकरी, उद्योग मिळण्याची संधी यामुळे निर्माण होणार आहे. केंद्र सरकार अशा उपक्रमाला चालना देण्यासाठी अनुदान देते, अशी माहिती सूर्यकांत दोडमिसे यांनी यावेळी दिली.

यावेळी संशोधक विद्यार्थिनी ब्राम्ही चौगुले हिचा सत्कार डॉ.मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने, उद्योजक चंद्रशेखर डोली, अरुण नानिवडेकर, रवींद्र डोली, प्रतिभा शिंगारे, रघुवीर राठोड, डॉ.सचिन पाटील, डॉ.धनराज जडगे, डॉ.नीलेश चौगुले, प्रा.युवराज गुरव, बाबासाहेब मुळीक उपस्थित होते. आभार प्राचार्य प्रवीण घेवारी यांनी मानले.

फोटो २५ माने मुळे मीट

फोटो ओळी-अशोकराव माने ग्रुफ ऑफ इन्स्टिट्यूट येथे डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांचा सत्कार विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनीषा माने उपस्थित होत्या.

Web Title: Visit of Dr. Dnyaneshwar Mule to Ashokrao Mane Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.