संस्थेच्या प्रगतीसाठी दूरदृष्टी महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST2021-07-22T04:17:12+5:302021-07-22T04:17:12+5:30

चंदगड : सध्या खाजगी आणि सहकारी वित्तीय संस्थांमध्ये व्यवसायाची मोठी स्पर्धा आहे. त्यात टिकून राहण्यासाठी संचालक मंडळाची दूरदृष्टी महत्त्वाची ...

Vision is important for the progress of the organization | संस्थेच्या प्रगतीसाठी दूरदृष्टी महत्त्वाची

संस्थेच्या प्रगतीसाठी दूरदृष्टी महत्त्वाची

चंदगड :

सध्या खाजगी आणि सहकारी वित्तीय संस्थांमध्ये व्यवसायाची मोठी स्पर्धा आहे. त्यात टिकून राहण्यासाठी संचालक मंडळाची दूरदृष्टी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दत्ता पाटील यांनी केले.

श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे येथील शाखेत आयोजित मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.

चौगुले म्हणाले, सभासद, ठेवीदार व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच अल्पावधीतच चंदगड शाखेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे.

यावेळी जिल्हा परिषदेतर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘लोकमत’चे बातमीदार नंदकुमार ढेरे, शाहू पुरस्कारप्राप्त गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार व पं.स. चे वरिष्ठ सहाय्यक तानाजी सावंत यांच्यासह मुख्याध्यापक अर्जुन गावडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार झाला.

यावेळी शाखा व्यवस्थापक दीपक शिंदे, प्रा. जी. एस. पाटील, निहाल नाईक, शाम आवडण आदी उपस्थित होते.

चंदगड शाखाध्यक्षा पुष्पा नेसरीकर यांनी स्वागत केले. डॉ. आर. एम. साळुंके यांनी सूत्रसंचलन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मायदेव यांनी आभार मानले.

फोटो ओळी : चंदगड येथे ‘लोकमत’चे बातमीदार नंदकुमार ढेरे यांचा एम. एल. चौगुले यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी दत्ता पाटील, पुष्पा नेसरीकर, सुमन सुभेदार, तानाजी सावंत, दत्तात्रय मायदेव, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

क्रमांक : २१०७२०२१-गड-०७

Web Title: Vision is important for the progress of the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.