शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दूरदृष्टी, हिंमत आणि धाडस म्हणजे मोदी, माजी मंत्री प्रकाश जावडेकरांचे गौरवोद्वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 18:01 IST

विलक्षण दृरदृष्टी असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा चेहरामोहरा बदलला.

कोल्हापूर : दूरदृष्टीने निर्णय घेण्याची हिंमत आणि तो निर्णय अंमलात आणण्याचे धाडस म्हणजे नरेंद्र मोदी होय, अशा शब्दात माजी मंत्री व खासदार प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा सोमवारी येथे गौरव केला.ब्राह्मण सभा करवीर आणि महालक्ष्मी बॅंकेच्यावतीने आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘मोदी@२१’ या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, विलक्षण दृरदृष्टी असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा चेहरामोहरा बदलला. जगभरात भारताचा दबदबा वाढला. ब्रिटनलाही मागे टाकून भारत महासत्ता बनण्यासाठी पुढे निघाला आहे. ३०० रुपयांचे एलईडी बल्ब आता ७० रुपयांना मिळू लागले. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेन्सचीही किंमत कमी झाली. काशी, महाकाल, केदारनाथचा विकास झाला आणि १ जानेवारी २०२४ ला भव्य राममंदिरही सर्वांसाठी खुले होणार आहे.ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक तीन लस बनवणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला. कोट्यवधी शौचालये, सर्वसामान्यांना पदम पुरस्कार, १० हजार माध्यमिक शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब अशा शेकडो योजनांच्या माध्यमातून मोदींनी बदल घडवून आणला. पूर्वी विदेशातील पाहुण्यांना ताजमहालची प्रतिकृती भेट दिली जायची. तिथे आता गावखेड्यातील कलाकाराची कलाकृती भेट दिली जाते.महाडिक म्हणाले, पूर्वी दिल्लीतून पाठवलेल्या एक रुपयांपैकी १५ पैसे गावपातळीवर यायचे. आता एका क्लिकवर दिल्लीतून पाठवलेला रुपयाच्या रुपया जनधन खात्याच्या माध्यमातून गावातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो हे नरेंद्र मोदी यांचे कर्तृत्व आहे. ॲड. विवेक शुक्ल यांनी स्वागत केले. विनोद डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. ॲड. राजेंद्र किंकर यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकर