‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी विश्वास पाटील शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:41 AM2021-05-05T04:41:53+5:302021-05-05T04:41:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांची नावे पुढे येत आहेत. ...

Vishwas Patil possible as the president of 'Gokul' | ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी विश्वास पाटील शक्य

‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी विश्वास पाटील शक्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांची नावे पुढे येत आहेत. पाच वर्षांत दोन्ही नेत्यांना संधी दिली जाणार असली तरी पहिल्या वर्षी अनुभवी विश्वास पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे.

‘गोकुळ’ची निवडणूक पार पडल्यानंतर आता अध्यक्ष निवडीचे वेध कार्यकर्त्यांना लागले आहे. विरोधी आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे अनुभवी चेहरा म्हणून पाटील व डोंगळे यांची नावे पुढे येत आहेत. दोघेही सत्तारूढ गट सोडून आले आहेत. त्यात डोंगळे हे सलग दुसऱ्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले आहेत. मात्र, महादेवराव महाडिक हे घरी जाऊनही विश्वास पाटील हे नमले नाहीत. शिवाय करवीरमध्ये विद्यमान आमदारांना टक्कर देऊन सर्वाधिक मते खेचून घेण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता जास्त आहे.

उपाध्यक्ष पदही निर्माण होणार

‘गोकुळ’मध्ये सध्या उपाध्यक्ष पद नाही. मात्र, जिल्हा बँकेच्या स्तरावर पोटनियमात बदल करून उपाध्यक्ष पद निर्माण केले जाणार आहे. तसे सूतोवाच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. तसे झाले तर उपाध्यक्षपदी अंजना रेडेकर यांची वर्णी लागू शकते.

दोन स्वीकृत व एक शासन नियुक्त

संघाच्या संचालक मंडळात दोन स्वीकृत व एक शासन नियुक्त संचालक असतो. त्यामध्ये पराभूतांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. या जागेसाठी आता मोर्चेबांधणी सुुरू होणार आहे.

Web Title: Vishwas Patil possible as the president of 'Gokul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.