‘गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने विश्वास पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:45+5:302021-06-19T04:16:45+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी (गोकुळ) पतसंस्थेच्या वतीने ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व ज्येष्ठ संचालक अरुण ...

Vishwas Patil felicitated on behalf of Gokul Employees Credit Union | ‘गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने विश्वास पाटील यांचा सत्कार

‘गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने विश्वास पाटील यांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी (गोकुळ) पतसंस्थेच्या वतीने ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, कर्मचारी पतसंस्‍था ही अगदी कमी व्‍याजदराने कर्मचारी सभासदांना कर्ज उपलब्‍ध करून देणारी संस्‍था असून, अतिशय चांगल्‍या प्रकारे संस्‍था चालविलेली आहे व संस्‍थेची १०० टक्के कर्जवसुली आहे. त्‍यामुळे त्‍यांनी संचालक मंडळ व व्‍यवस्‍थापनाचे कौतुक केले.

कर्मचारी पतसंस्थेस गोकुळ दूध संघास सर्वतोपरी मदत करील असे आश्‍वासन अरुण डोंगळे यांनी दिले.

यावेळी, पतसंस्‍थेचे अध्यक्ष प्रकाश आसुर्लेकर, उपाध्यक्ष सतीश मदने, पी. आर. पाटील, संभाजी देसाई, शिवाजी पाटील, नंदकुमार गुरव, सुनील घाटगे, राजेंद्र पाटील, गणपती कागनकर, शुभदा पाटील, छाया बेलेकर, व्‍यवस्‍थापक संभाजी माळकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : ‘गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आसुर्लेकर, सतीश मदने, पी. आर. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१८०६२०२१-कोल-गोकुळ पतसंस्था)

Web Title: Vishwas Patil felicitated on behalf of Gokul Employees Credit Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.