मंगल कानडेच्या घरासाठी विश्वराज महाडिक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST2021-08-24T04:27:54+5:302021-08-24T04:27:54+5:30

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील मंगल शंकरराव कानडे या महिलेच्या घराची पावसामुळे पडझड झाल्याने त्यांना मदतीची गरज असल्याचे वृत्त ...

Vishwaraj Mahadik rushed for Mangal Kanade's house | मंगल कानडेच्या घरासाठी विश्वराज महाडिक सरसावले

मंगल कानडेच्या घरासाठी विश्वराज महाडिक सरसावले

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील मंगल शंकरराव कानडे या महिलेच्या घराची पावसामुळे पडझड झाल्याने त्यांना मदतीची गरज असल्याचे वृत्त दैनिक लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर आता कानडे यांच्यासाठी अनेकांनी दातृत्वाची कवाडे खुली केली आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र विश्वराज महाडिक यांनी कानडे यांची भेट घेऊन घराचा प्रश्न तातडीने सोडविणार असल्याचे सांगितले. यावेळी अनिल लाडगे, माजी सरपंच एकनाथ माने, दत्तात्रय आवळे, पोपट नाईक, बाबासाहेब माने, चंद्रकांत पंडित, विक्रांत पाटील, वसंत माने, अशोक लाडगे, प्रकाश मेटकरी, वैभव माने उपस्थित होते.

कोट :

लोकमतमध्ये कानडे यांच्या घराविषयीची बातमी वाचली. कानडे कुटुंबीयांना लागेल ती मदत करणार आहे. इंजिनिअरकडून प्लॅन करून घेत असून, त्यांचे घर नक्की उभे करणार आहे. - विश्वराज महाडिक.

कोट

: उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडून कानडे कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे मागवून घेतली आहेत. ही कागदपत्रे गटविकास अधिकारी यांना देणार आहोत. लवकरच याविषयी तोडगा निघेल.

- सरपंच सुवर्णा माने.

फोटो : मंगल कानडे यांच्या पडझड झालेल्या घराची विश्वराज महाडिक यांनी पाहणी केली.

Web Title: Vishwaraj Mahadik rushed for Mangal Kanade's house