शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

समीर देसाईकडून विष्णू खोसे चितपट- : काळाइमाम तालीम ट्रस्टचे कुस्ती मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:22 AM

कोल्हापूर : काळाइमाम तालीम पैलवान व ट्रस्टच्या वतीने आयोजित कुस्ती मैदानात डाव-प्रतिडावांनी रंगलेल्या पहिल्या क्रमांकाच्या लढतीत गारगोटीच्या समीर देसाई ...

ठळक मुद्देरवींद्र शेडगेची उदयराज पाटीलवर मात

कोल्हापूर : काळाइमाम तालीम पैलवान व ट्रस्टच्या वतीने आयोजित कुस्ती मैदानात डाव-प्रतिडावांनी रंगलेल्या पहिल्या क्रमांकाच्या लढतीत गारगोटीच्या समीर देसाई याने पुण्याच्या विष्णू खोसे याला एकचाक डावावर शुक्रवारी चितपट केले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तिसºया क्रमांकाच्या लढतीत अहमदनगरच्या रवींद्र शेडगे याने मोतीबाग तालमीच्या उदयराज पाटील याच्यावर आखडी डावाने मात केली.

या ट्रस्टतर्फे पैलवान लक्ष्मण वडार आणि कृष्णा कळंत्रे यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी खासबाग मैदान येथे कुस्ती मैदान घेण्यात आले. आखाडा पूजनानंतर दुपारी चार वाजता कुस्त्यांना सुरुवात झाली. यावेळी नंदकुमार मोरे, महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडाधिकारी बाजीराव कळंत्रे, उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, प्रकाश चौगले, संभाजी पाटील, मारुती ढेरे, काळाइमाम ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष सांगवडेकर, आदी उपस्थित होते. दर्दी कुस्तीशौकिनांच्या उपस्थितीत रात्री सव्वाआठ वाजता पहिल्या क्रमांकासाठी गारगोटीच्या अमोल बुचडे कुस्तीसंकुलाचा पैलवान समीर देसाई आणि पुणे सह्याद्री आखाड्याचा पैलवान विष्णू खोसे यांच्यात लढत सुरू झाली. प्रारंभी दोन्ही मल्लांनी एकमेकांची गर्दनखेच करीत ताकद आजमाविली. त्यात विष्णू याने लागोपाठ दोन वेळा एकेरी पट काढत समीरचा ताबा घेतला. त्यातून समीर निसटला. या दोघांकडून एकमेकांचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात कुस्ती मैदानाबाहेर गेली.

पुन्हा खडाखडी सुरू झाली. समीरने एकचाक मारण्याचा केलेला प्रयत्न विष्णूने धुडकावून लावला. त्यावर आक्रमकपणे चढाई करीत समीरने एकचाक डावावर विष्णूला चितपट केले. डाव-प्रतिडावांनी रंगलेल्या सहा मिनिटांच्या कुस्तीने शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दुसºया क्रमांकासाठी मोतीबाग तालमीचा पैलवान संतोष लव्हटे आणि महाराष्ट्र पोलीसचा पैलवान विक्रम वडतिले एकमेकांना भिडले. २० मिनिटांहून अधिक वेळ चाललेली कुस्ती अखेर बरोबरीत सोडविण्यात आली. शाहू कुस्ती केंद्राचा सरदार सावंत आणि महाराष्ट्र पोलीसचा शंकर बंडगर यांच्यातील चौथ्या क्रमांकाची कुस्ती २० मिनिटे चालली. त्यात सरदार याने घिस्सा डावावर शंकर याला पराभूत केले. पाचव्या क्रमांकाच्या लढतीत अभिजित भोसले याने सतीश अडसूळ याच्यावर, तर सहाव्या क्रमांकाच्या लढतीमध्ये न्यू मोतीबाग तालीमचा अनिल चव्हाण याने मुरगूडच्या रोहन रंडे याला गुणांवर हरविले. विजेता पैलवान समीर याला उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाजीराव कळंत्रे, संभाजीराव पाटील, अ‍ॅड. मुनाफ मणेर, बाजीराव पाटील, संग्राम कळंत्रे, संचित वडार, आदी उपस्थित होते. मारुती जाधव (बटू) यांनी निवेदन केले.प्रेक्षणीय, चटकदार कुस्त्याया मैदानात प्रेक्षणीय आणि चटकदार कुस्त्या रंगल्या. त्यामध्ये अजित पाटील, पृथ्वीराज पाटील, समाधान खताळ, युवराज जाधव, बाबा रानगे, कृष्णात कांबळे, चैतन्य लिमन, माणिक कारंडे, विनायक गुरव, पार्थ चौगले, इंद्रजित चौगले, आविष्कार खोत, समर्थ खोत, संस्कार गोसावी, सोपान पाटील, सोन्या राऊत, तुषार जाधव, संदीप बिराजदार, ओंकार लाड, साहील चौगले, सौरभ पाटील, मयूर चौगले, शुभम चौगले, आदित्य वरिंगकर, सोहम पाटील, आदी विजयी झाले.मान्यवरांची उपस्थितीमहानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रीडाधिकारी बालाजी बरबडे, बिद्री कारखान्याचे किसनराव मोरे, महाराष्ट्र चॅम्पियन महिपती केसरे, संपत पाटील, नामदेव मोळे, वस्ताद रंगा कळंत्रे, ज्येष्ठ मल्ल अशोक पाटील, हणमंत जाधव, संभाजी किसरूळकर, शामराव खडके, पांडुरंग पाटील, बाबा महाडिक, बंकट थोडगे, आदींनी मैदानाला उपस्थिती लावली.क्षणचित्रेकाळाइमाम तालमीच्या मल्लांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच कुस्ती मैदान भरविले.पैलवान संभाजी टिपकुर्लीकर यांनी डोक्याने फोडला नारळमहिला मल्ल माधुरी घराळ हिचा सत्कारसौंदलगा येथील श्रीधर आणि विठ्ठल आयवळे, आकाश कांबळे, संतोष घाटगे, सूरज माने यांनी हलगी-कैताळाने मैदान दणाणून सोडले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर