शिवाजीपेठ शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी विशाल बोंगाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:58 IST2021-01-13T04:58:48+5:302021-01-13T04:58:48+5:30

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिखर संस्था असणाऱ्या शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने शनिवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या नियोजनासाठी बैठक झाली. ...

Vishal Bongale as the President of Shivajipeth Shiv Jayanti Festival | शिवाजीपेठ शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी विशाल बोंगाळे

शिवाजीपेठ शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी विशाल बोंगाळे

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिखर संस्था असणाऱ्या शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने शनिवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या नियोजनासाठी बैठक झाली. यावेळी उत्सव कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्याध्यक्षपदी विशाल बोंगाळे आणि उपाध्यक्षपदी सुरेश ऊर्फ पंपू सूर्यवंशी, सुरज आमते, अभिषेक शिंदे यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण होते.

सचिवपदी अक्षय मोरे, विशाल जाधव, सहसचिव विक्रमसिंह सदाशिव जरग, खजानिस अभिजित इंगवले, मिरवणूक समिती ऋतुराज सरनोबत, धार्मिक समिती सुनील राऊत, बाळासाहेब सासने, व्याख्यानमाला समिती रणधीर खराडे, रवि साळोखे यांची निवड झाली. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक अजित राऊत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, सुरेश जरग, सदाभाऊ शिर्के, ॲड. अशोकराव साळोखे, अजित खराडे, मोहन साळोख, लालासो गायकवाड आदी उपस्थित होते.

शिवाजी पेठ शिवजयंती उत्सव निवड बातमी फोटो ओळी

फोटो : १००१२०२१ कोल विशाल बोंगाळे निवडफोटो : १००१२०२१ कोल सुरेश सूर्यवंशी निवड

Web Title: Vishal Bongale as the President of Shivajipeth Shiv Jayanti Festival