शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील विविध प्रश्नी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने

By संदीप आडनाईक | Updated: June 27, 2024 18:20 IST

अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवकांनी नागरिकांसह महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने केली. ‘कधी देता पाणी, डोळ्या आले पाणी’, ‘पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ, नियोजनात मोठा घोळ’, ‘कचरा उठाव गडबडला, गावभर कचरा पसरला’, ‘नगररचना खाते करतं काय, सामान्यांच्या कामात आडवा पाय’ अशा विविध घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले.कोल्हापूर महापालिकेत साडेतीन वर्षापासून सुरु असलेल्या प्रशासकीय कामकाजादरम्यान, विविध नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत प्रशासनाला जाग आणण्यासाठी नागरिकांनी शेकडो तक्रारी सोबत घेत महापालिकेसमोर सकाळी ११ वाजता जोरदार निदर्शने केली. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, डॉ.अश्विनी माळकर, प्रा. नीलिमा व्हटकर, जयंत गोयाणी, प्रताप देसाई यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे आणि प्रदीप उलपे यांनी ११ जून रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तर त्याआधीच्या आठवड्यात मुक्त संवाद आयोजित करुन नागरिकांच्या तक्रारी तसेच कोल्हापूरच्या विकासासंबंधीच्या संकल्पना एकत्रित केल्या होत्या.अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी झालेल्या चर्चेत माजी नगरसेवक किरण नकाते, रश्मी साळोखे, सविता साळोखे, प्रकाश घाटगे, ओंकार गोसावी, अमेय भालकर, सुनील पाटील यांनी वेगवेगळ्या विभागाविषयींच्या तक्रारींची माहिती दिली, तसेच या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक विभागासोबत स्वतंत्र बैठक घेण्याची, तसेच बैठकीनंतर त्याच आठवड्यात प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी आंदोलकांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित विभागासोबत स्वतंत्र बैठका बोलावू असे सांगितले.या आंदोलनात प्रसाद पाटोळे, बापू राणे, सविता सोलापूरे, मनोज प्रसादे, नितीन वणकुद्रे, सुमंत जाधव, साजिद आत्तार, मिलिंद टोपले, मिथुन मगदूम, नीरज कुंभोजकर, गणेश राणे, कैलास पाटील, उमेश कांबळे, संग्राम पाटील, मानसिंग पवार, सतीश सुतार, संग्राम लोहार, रणजित सुतार, अभिजित सुर्यवंशी, अतुल शिंदे सहभागी झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन