हुपरी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:09+5:302021-01-16T04:27:09+5:30
याबाबत समजलेली माहिती अशी, येथील एका चांदी व्यावसायिकाच्या दुकानातील परप्रांतीय मजुराचा व स्थानिक तरुणांत मोटारसायकल खरेदी -विक्रीचा काही दिवसांपूर्वी ...

हुपरी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी
याबाबत समजलेली माहिती अशी, येथील एका चांदी व्यावसायिकाच्या दुकानातील परप्रांतीय मजुराचा व स्थानिक तरुणांत मोटारसायकल खरेदी -विक्रीचा काही दिवसांपूर्वी व्यवहार झाला होता. या व्यवहारातूनच आज दुपारी वादावादी होऊन त्या परप्रांतीय मजुराला स्थानिक तरुणांनी मारहाण केली. हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या माजी सरपंचांच्या मुलास व पुतण्यास दहा ते पंधरा जणांच्या तरुणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्या व हॉकीस्टिकने जोरदार मारहाण केली. यामध्ये एक तरुण गंभीर व एक जण किरकोळ जखमी झाला. या मारहाणीची माहिती समजताच एका गटाच्या समर्थकांनी दिवसभर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती; मात्र रात्री उशिरापर्यंत हुपरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झालाच नाही.