शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्या ‘ईडी’ चौकशीच्या व्हिडीओने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:16 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमाप संपत्ती गोळा केली असून त्यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, या मागणीचा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कोल्हापूर शहरात एकच खळबळ माजली; पण या व्हिडीओचे खंडन करीत हा खोडसाळपणा असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले; तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली.

ठळक मुद्देराजेश क्षीरसागर यांनी केले खंडन खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाईची चिकोडे यांची मागणी

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमाप संपत्ती गोळा केली असून त्यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करावी, या मागणीचा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कोल्हापूर शहरात एकच खळबळ माजली; पण या व्हिडीओचे खंडन करीत हा खोडसाळपणा असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले; तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली.राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असली तरी कोल्हापूर शहरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहिल्या. त्यातूनच गेल्या वर्षी आमदार क्षीरसागर यांनी पालकमंत्र्यांवर बोचरी टीका करीत, मंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीत अमाप वाढ झाली असून देवस्थानच्या जमिनीतून त्यांनी मोठी संपत्ती गोळा केली.

त्याची ‘ईडी’मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे क्षीरसागर यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यानंतर या दोन नेत्यांतील वाद टोकाला गेला होता; पण लोकसभा निवडणुकीवेळी युती झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला.अचानकच क्षीरसागर यांचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ माजली. भाजपचे राहुल चिकोडे यांनी राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता, मंत्री चंंद्रकांत पाटील व आपल्यात कोणीतरी वितुष्ट निर्माण करण्याचा खोडसाळपणा करीत आहे. केंद्रानंतर आता राज्यातही युतीची सत्ता येणार असल्याने काहीजणांनी जाणीवपूर्वक चुकीचे जुना व्हिडीओ व्हायरल केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.सोशल मीडियामार्फत पालकमंत्री पाटील यांच्याबद्दल चुकीचा जुना व्हिडिओ व्हायरल करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल केला, त्यांच्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे चिकोडे यांनी पत्रकात म्हटले आहे.पोलिसांकडून चौकशीव्हिडीओ कोणी व्हायरल केला, त्याची पोलिसांनी रविवारी संबंधितांकडे चौकशी केली. आमच्याकडे आलेला व्हिडिओ तो पुढे पाठविल्याची माहिती संबंधितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर