कोरोनाबाबत सूचनांचे उल्लंघन, स्पर्धा आयोजकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:52 IST2020-12-11T04:52:37+5:302020-12-11T04:52:37+5:30

मुलाच्या वाढदिवसासाठी क्रिकेट स्पर्धा भरवून त्यामध्ये चिअर गर्ल्स नाचविणे संयोजकांच्या चांगलेच अंगलट आले. कोरोना संदर्भातील शासनाच्या सूचनांचे उल्लंघन ...

Violation of instructions regarding corona, crime against competition organizers | कोरोनाबाबत सूचनांचे उल्लंघन, स्पर्धा आयोजकांवर गुन्हा

कोरोनाबाबत सूचनांचे उल्लंघन, स्पर्धा आयोजकांवर गुन्हा

मुलाच्या वाढदिवसासाठी क्रिकेट स्पर्धा भरवून त्यामध्ये चिअर गर्ल्स नाचविणे संयोजकांच्या चांगलेच अंगलट आले. कोरोना संदर्भातील शासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रघुनाथ दिनकर पाटील (रा. गवशी पैकी पाटील वाडी ) असे त्यांचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रघुनाथ पाटील यांनी मुलगा भैरवनाथ याच्या वाढदिवसानिमित्त गावात क्रिकेट स्पर्धा भरविल्या आहेत. दोन दिवसांपासून या स्पर्धा सुरू असून, यामध्ये चिअर गर्ल्स आणून त्यांना नाचविले जात होते. यावेळी कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन केलेले नव्हते. याबाबतची चित्रफीत जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात पोहोचली. त्यांच्या आदेशानुसार राधानगरी पोलिसांनी या चित्रफितीतील सर्व संबंधितांवर गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Violation of instructions regarding corona, crime against competition organizers