विम्यानेही झिडकारले शेतकऱ्यांना

By Admin | Updated: March 9, 2015 23:51 IST2015-03-09T23:27:46+5:302015-03-09T23:51:09+5:30

जिल्ह्यातील स्थिती : शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचे भले; हप्त्याएवढीही भरपाई नाही

Vimmike also rejected the farmers | विम्यानेही झिडकारले शेतकऱ्यांना

विम्यानेही झिडकारले शेतकऱ्यांना

अशोक डोंबाळे - सांगली --विमा कंपन्यांच्या जाचक नियमांमुळे अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शासनाने विमा कंपन्यांशी करार करताना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचेच हित पाहिल्याचे विमा कंपन्यांच्या भरपाईवरून स्पष्ट होत आहे. खरीप २०१४ या हंगामामधील शेतकऱ्यांनी एक कोटी ८६ लाख ३२ हजार ४३ रूपयांचा विमा हप्ता भरून पिकांचा विमा उतरला होता. या पिकांचे ४३ कोटी ३० लाख १६ हजार ९७० रूपयांचे विमा संरक्षण होते. नैसर्गिक आपत्तीमुळे १८ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना दोन कोटी ६८ लाख सहा हजार ४० रूपयांची भरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांना तर विमा हप्त्यापेक्षाही कमी भरपाई मिळाल्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये व नगदी पिकांच्या उत्पादनावर खरीप हंगामात हवामानाच्या विविध घटकांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने खरीप २०१४ पासून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील हवामानावर आधारीत पिक विमा योजना सुरु केली आहे. सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद या चार पिकांची निवड केली होती. या पिकांचे तीन कारणामुळे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई द्यावी असे ठरले आहे. त्यानुसार विमा कंपनी, शासनाने प्रत्येक मंडलस्तरावर वेदर स्टेशन बसविली आहेत. दहा ते बारा गावांचे एक मंडल असल्यामुळे वेदर स्टेशन बसविलेल्या ठिकाणी पाऊस झाला नाही. उर्वरित गावामध्ये पाऊस झाला तरीही तो तेथे नोंदविला जात नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे.
वायफळे येथील शेतकऱ्यांनी दोन लाख ८० हजार रूपये विमा हप्ता भरला होता. येथे पाऊसच न झाल्यामुळे खरीप ज्वारी, उडीद पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून ठोस भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेने विमा कंपनीकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना धक्काच बसला. केवळ ८० हजार रूपये त्यंना मिळाले. म्हणजे भरलेली रक्कमही शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. वायफळे येथीलच महादेव पाटील या शेतकऱ्याने उडीद पिकासाठी हेक्टरी शेतकरी हिस्सा म्हणून ६१६ रूपये आणि शासनाने २०५ रूपये विमा हप्ता भरला होता. विमा कंपनीकडून हेक्टरी अकराशे रूपये भरपाई मिळाली आहे. या रकमेतून शेतकऱ्यांच्या पदरात बियाणांची रक्कमही पडली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ज्वारीचे नुकसान व भरपाई
तालुकाक्षेत्र हेक्टरभरलेली रक्कममिळालेली भरपाई
क़महांकाळ२०६९.३३२५ लाख ७४ हजारपाच लाख ७३ हजार
कडेगाव२९३.२३दोन लाख ९० हजारएक लाख एक हजार
खानापूर१०५३.१५१३ लाख १० हजारसात लाख ९४ हजार
मिरज१२.४८१२ हजारसात हजार
शिराळा१३.४६१० हजार१६ हजार
तासगाव३८५.५६चार लाख ८० १८ हजार
वाळवा११.५८१२ हजार१८ हजार


बाजरीचे नुकसान आणि भरपाईची रक्कम
तालुकाक्षेत्र हेक्टरभरलेली रक्कममिळालेली भरपाई
आटपाडी२०८८.५३१९ लाख ६९ हजार ९० लाख ५२ हजार
जत५५४२.७९५१ लाख ४१ हजार२३ लाख ३ हजार
क़महांकाळ२००२.२९१८ लाख ८६ हजार००००
खानापूर११७.०१७० हजार११ हजार
मिरज३४.१९२२ हजार५४ हजार

त्रुटींमुळे होते शेतकऱ्यांचे नुकसान
विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे अपुरा पाऊस, पावसातील खंड आणि अति पाऊस या तीन घटकांमुळे पिकांचे नुकसान झाले तरच त्यांना भरपाई मिळणार होती. हवामान यंत्रे बसविण्यातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. सांगली जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड केली होती. या विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०१४ मध्ये जिल्ह्यातील ४० हजार २७४ शेतकऱ्यांनी एक कोटी ८६ लाख ३२ हजार ४३ रूपये विमा रक्कम भरून ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद पिकांचा विमा उतरला होता. या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी ४३ कोटी ३० लाख १६ हजार ९७० रूपयांचे विमा संरक्षण होते. विमा मंजूर करण्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये नुकसान होऊनही त्यांना अपेक्षित भरपाई मिळाली नाही.

Web Title: Vimmike also rejected the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.