शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
2
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
3
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
4
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
5
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
6
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
7
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
8
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
9
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
10
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
11
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
12
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
13
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
14
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
15
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
16
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
17
Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
18
Panvel Municipal Election 2026: 65 टक्के मालमत्ता कर सवलत देणार, 'शेकाप-मविआ'चा बॉन्ड पेपरवर वादा
19
"माझ्या नशिबात जे लिहिलं आहे, ते…" टी-20 संघातून डच्चू दिल्याबद्दल गिल पहिल्यांदाच मनातलं बोलला!
20
"काम करा, मग तोंड दाखवा..." जळगावात उमेदवार प्रचाराला आले अन् महिलांचा संताप अनावर झाला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वाठार येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी, गाव बंद ठेवून निषेध; नेमकं प्रकरण काय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:07 IST

१५ ऑगस्टपासून साखळी उपोषणाचा इशारा

नवे पारगाव : वाठार तर्फ वडगावच्या  (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळास साडेसात एकर जमीन दिल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शासनाच्या आदेशाची होळी केली. या निर्णयाच्या विरोधात ग्रामपंचायतीसमोर १५ ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला.वाठारच्या गट नं. ११३ ''ब''मधील सुमारे ३३ आर. क्षेत्र मालकी हक्काने, तर क्रीडांगणासाठी सुमारे २ हेक्टर ६६ आर. तीस वर्षे भाडेपट्ट्याने अशी सुमारे साडेसात एकर जमीन जिल्हाधिकारी यांनी अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळास दिली आहे. गावच्या विकासाच्या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीने मागणी केली असूनही ही जागा संस्थेला देण्यात आली. याविरोधात ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत आदेशाची होळी केली.मोर्चाचे नेतृत्व सरपंच सचिन कांबळे, वारणा दूध संघांचे संचालक महेंद्र शिंदे, युवासेनेचे संदीप दबडे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे आदींनी केले. यावेळी उपसरपंच अश्विनी कुंभार, सदस्य सुहास पाटील, सचिन कुंभार, रेश्मा शिंदे, रुकसाना नदाफ आदींसह नानासो मस्के, राजहंस भुजिंगे, नाना कुंभार, शरद सांभारे, संतोष वाठारकर, अनिल दबडे, संदीप पाटील, मोहसीन पोवाळे, बी. एस. पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी शैक्षणिक संस्थेसाठी काही जमीन भाडेपट्ट्याने व काही जमीन मालकी हक्काने दिली आहे. हे पूर्णपणे कायदेशीर पध्दतीने झाले आहे. या शैक्षणिक संस्थेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात. पण, केवळ व्यक्तीगत आकसापोटी काही हा प्रकार घडवून आणत आहेत. चुकीच्या पध्दतीचा व्यवहार असेल तर कायदेशीर मार्गाने जाण्यास आमची कोणतीही हरकत नाही.- विजयसिंह माने, अध्यक्ष, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप