शिरोळमधील ३३ गावांचे गावकारभारी उद्या ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:53+5:302021-01-17T04:21:53+5:30
जयसिंगपूर/शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी (दि.१८) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार आहे. २० टेबलवर एकूण तेरा ...

शिरोळमधील ३३ गावांचे गावकारभारी उद्या ठरणार
जयसिंगपूर/शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींकरिता सोमवारी (दि.१८) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार आहे. २० टेबलवर एकूण तेरा फेऱ्यांमध्ये ही मोजणी होणार आहे. स्थानिक गट नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यामध्ये ८३.७२ टक्के मतदान झाले असून, आता उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये गावागावांत ‘विजयाचा गुलाल कोणाला लागणार, किती मते पडतील’ या चर्चांना ऊत आला आहे. प्रत्येक जण आपल्या गटाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे ठासून सांगत आहे. काही ठिकाणी पैजाही लावल्या जात आहेत.
तालुक्यातील नांदणी, दानोळी, उदगाव, कोथळी, चिपरी, शिरढोण, यड्राव, दत्तवाड, धरणगुत्ती या गावांत मोठ्या चुरशीने मतदान झाले असून, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, यड्रावकर गट, भाजप यांच्या स्थानिक गटा-तटाद्वारे कार्यकर्त्यांनी निवडणुका लढविल्या आहेत. एकूणच जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, गटप्रमुख, पक्षप्रमुख, आजी-माजी सरपंच व सदस्यांच्या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (दि.१८) समजणार आहे. दरम्यान, प्रवेश पासशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नसल्याचे तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी सांगितले.
चौकट- फेरीनिहाय होणार मतमोजणी
पहिली फेरी- कुटवाड, गौरवाड, बस्तवाड, गणेशवाडी. दुसरी- जैनापूर, दानोळी. तिसरी- तमदलगे, नांदणी. चौथी- निमशिरगाव, उदगाव. पाचवी- कोंडिग्रे, नृसिंहवाडी, शिरदवाड. सहावी- जुने दानवाड, कोथळी, तेरवाड. सातवी- धरणगुत्ती, घोसरवाड. आठवी- जांभळी, आलास, मजरेवाडी. नववी- शेडशाळ, टाकळीवाडी, अर्जुनवाड, घालवाड. दहावी- शिरटी, कवठेगुलंद, बुबनाळ, शिरढोण, घालवाड. अकरावी- शिरढोण, यड्राव. बारा- चिपरी. तेरा- दत्तवाड.
फोटो - १६०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ -
शिरोळ येथे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. (छाया- सुभाष गुरव, शिरोळ)