शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात गाववार बैठका :  वसंतराव मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:42 IST

MarathaMahasangh, Villege, Maratha Reservation, kolhapurnews मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळविण्यासाठी जिल्ह्यात गाववार बैठक घेवून जनजागृतीची मोहिम राबविणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात गाववार बैठका :  वसंतराव मुळीकगडहिंग्लज येथील विभागीय बैठकीत माहिती

गडहिंग्लज : मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळविण्यासाठी जिल्ह्यात गाववार बैठक घेवून जनजागृतीची मोहिम राबविणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येथे गडहिंग्लज विभागीय आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे होते. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली.मुळीक म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे लाल महल ते लाल किल्ला अशा देशव्यापी आंदोलनाची गरज आहे. त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांनी वज्रमूठ बांधायला हवी.सावंत म्हणाले, ओबीसी अंतर्गतच स्वतंत्र प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. त्यासाठी ओबीसीमध्ये स्वतंत्र प्रवर्गाची घटनात्मक तरतूद करण्याची गरज आहे. आरक्षण मिळेपर्यंत राज्य शासनाने मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सवलती द्याव्यात, असे बजावून सांगायला हवे. यावेळी गडहिंग्लज तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव भुकेले, आजरा तालुकाध्यक्ष मारूती मोरे, सुनिल शिंत्रे यांचीही भाषणे झाली.बैठकीस विद्याधर गुरबे, दिग्विजय कुराडे, नागेश चौगुले, चंद्रकांत सावंत, किरण खोराटे, प्रकाश तेलवेकर, श्रद्धा शिंत्रे, अलका भोईटे, शिवणे गुरूजी आदींसह गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. गडहिंग्लज तालुकाध्यक्ष किरण कदम यांनी प्रास्ताविक केले. दिलीप माने यांनी आभार मानले.

त्यांच्याकडे लक्ष देवू नका..!राजकीय झुल पांघरून समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांचे नेतृत्व समाज नाकारू शकतो. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मराठा आरक्षणासंदर्भात कोण काय बोलतो त्याकडे लक्ष देवू नका, असे आवाहनही इंद्रजीत सावंत यांनी केले.

 

टॅग्स :maratha mahasanghमराठा महासंघkolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण